घरटेक-वेक'इन्फिनिटी डिस्प्ले'सह नवा सॅमसंग गॅलेक्सी

‘इन्फिनिटी डिस्प्ले’सह नवा सॅमसंग गॅलेक्सी

Subscribe

सॅमसंगनं गॅलेक्सी जे ८ आणि जे ६ ची २० लाखांपेक्षा जास्त विक्री केली आहे. पुढच्याच आठवड्यात सॅमसंग गॅलेक्सी नवा स्मार्टफोन लाँच करणार असून 'इन्फिनिटी डिस्प्ले'सह हा मोबाईल असणार आहे.

सध्या बाजारात विविध कंपन्यांचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. तर आता ऑनलाईन स्मार्टफोनचं मार्केटही मोठ्या प्रमाणात वाढीला लागलं आहे. पुढच्याच आठवड्यात सॅमसंग गॅलेक्सी नवा स्मार्टफोन लाँच करणार असून ‘इन्फिनिटी डिस्प्ले’सह हा मोबाईल असणार आहे. आगामी गॅलेक्सी डिव्हाईस हा ऑनलाईन एक्सक्लुझिव्ह होणार आहे. या मोबाईलमध्ये एमोलेड डिस्प्लेसह ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज असेल. दरम्यान ९ ऑगस्टला हा फोन ऑनलाईन लाँच होणार आहे.

- Advertisement -

सॅमसंगचा दोन महिन्यात दुसरा स्मार्टफोन

सॅमसंगनं दोन महिन्यात हा दुसरा ऑनलाईन एक्सक्लुझिव्ह स्मार्टफोन आणला आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला कंपनीनं गॅलेक्सी ऑन ६ हा मोबाईल ऑनलाईन आणला होता. हा मोबाईलदेखील ई – कॉमर्स प्लॅटफॉर्मवरच विकण्यात आला होता. तर ‘इन्फिनिटी डिस्प्ले’सह हा पहिला मोबाईल फोन होता. दरम्यान नुकतीच सॅमसंगनं गॅलेक्सी जे ८ आणि जे ६ ची २० लाखांपेक्षा जास्त विक्री केली आहे. कंपनीच्या सांगण्यानुसार, प्रतिदिन या दोन्ही मोबाईलची साधारण ५० हजारपेक्षा जास्त विक्री झाली. सॅमसंगच्या या लागोपाठ ऑनलाईन एक्सक्लुझिव्ह स्मार्टफोनमुळं २०१८ मधील दुसऱ्या तिमाहीमध्ये शाओमी कंपनीला मागे टाकत २९ टक्के फायदा सॅमसंगनं मिळवला असल्याची माहिती आहे. दरम्यान गॅलेक्सी जे६ हा २२ मे रोजी लाँच करण्यात आला होता. तर, गॅलेक्सी जे ८ हा १ जुलै रोजी लाँच करण्यात आला. सध्या या स्मार्टफोन्सना बाजारामध्ये चांगली मागणी असल्याची माहिती आहे. सध्या बाजारात मोबाईल कंपन्यांमध्ये प्रचंड चढाओढ असल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळं लवकरच या नव्या स्मार्टफोनला कसा प्रतिसाद मिळतो आहे हे कळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -