घरक्रीडाभांगडा करतच मैदानात उतरले विराट आणि शिखर

भांगडा करतच मैदानात उतरले विराट आणि शिखर

Subscribe

विराट कोहली आणि शिखर धवन हे दोघंही पंजाबी असल्यामुळं पंजाबी ढोलचे आवाज कानावर पडताच आपोआपच दोघांचाहे पाय थिरकले आणि भांगडा करतच दोघंही मैदानावर उतरले.

भारत आणि इंग्लिश क्रिकेट कौंटी एसेक्सदरम्यान तीन दिवसीय सराव मॅच खेळवण्यात आली होती. ही मॅच ड्रॉ झाली आहे. या मॅचच्या सुरुवातील पिचवर उतरताना टीम इंडियाचं स्वागत पंजाबी स्टाईमध्ये करण्यात आलं. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मॅचच्या शेवटच्या दिवशी चेम्सफोर्डला कौंटी मैदानावर दोन्ही टीम उतरत असताना टीम इंडियाचं पंजाबी स्टाईलमध्ये ढोल नगाडे वाजवून स्वागत करण्यात आलं. भांगडा हा पंजाबचा अतिशय लोकप्रिय डान्स असून संपूर्ण भारतात हा डान्स केला जातो. विराट कोहली आणि शिखर धवन हे दोघंही पंजाबी असल्यामुळं पंजाबी ढोलचे आवाज कानावर पडताच आपोआपच दोघांचाहे पाय थिरकले आणि भांगडा करतच दोघंही मैदानावर उतरले. त्यांचा हाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून नेटिझन्सकडून लाईक केला जात आहे.

- Advertisement -

विराट आणि शिखर नेहमीच मस्तीत

विराट कोहली आणि शिखर धवन हे दोघंही हार्डकोअर पंजाबी असल्यामुळं नेहमीच आपली मस्ती दाखवतात. त्यांच्या व्यक्तिगत अकाऊंटवरूनही त्यांचे बरेच डान्सचे व्हिडिओ याआधीही व्हायरल झाले आहेत. कोहलीला जेव्हा पंजाबी ढोलचे आवाज येतात तेव्हा तो कधीच एक क्षणही न घालवता डान्स सुरु करतो हे नेहमीच दिसलं आहे. अशावेळी मैदानातही त्यानं ही परंपरा कायम राखत डान्स करतच प्रवेश केला. दरम्यान याआधी दुसऱ्या दिवशी दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याचंदेखील मैदानात उतरल्यानंतर ढोल आणि पंजाबी डान्सर्सकडून स्वागत करण्यात आलं होतं. मात्र या दोघांनीही डान्स केला नाही. हा व्हायरल व्हिडिओ बीसीसीआयनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला असून चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे.

एसेक्ससहित मॅच झाली ड्रॉ

टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये ३९५ रन्स केले. यामध्ये कॅप्टन विराट कोहली आणि दिनेश कार्तिकनं अनुक्रमे ६२ आणि ८२ रन्स केले. तर, के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्यानं अर्धशतक केलं. उमेश यादवनं ४ तर ईशांत शर्मानं ३ विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये २ विकेट्स गमावून ८९ रन्स करत भारतानं ही मॅच ड्रॉ केली. तर इंग्लंडच्या अॅक्सेस टीमनं आठ विकेट्स गमावून ३५९ वर डाव घोषित केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -