घरदेश-विदेशCoronaVirus: कोरोना वॉर्डमध्ये लहान मुलांसोबत डॉक्टर खेळतायत अंताक्षरी

CoronaVirus: कोरोना वॉर्डमध्ये लहान मुलांसोबत डॉक्टर खेळतायत अंताक्षरी

Subscribe

मुलांच्या मनातून कोरोनाबद्दलची भिती दूर करण्यासाठी रूग्णालयातील डॉक्टरांनी अनोखी युक्ती करत ते आनंदी कसे राहतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

आरएनटी मेडिकल कॉलेज उदयपूर येथील महाराणा भूपाल हे रूग्णालय कोरोना रुग्णांसाठी सज्ज करण्यात आले आहे. या रूग्णालयातील कोरोनाग्रस्तांसाठी असलेल्या वॉर्डमध्ये कुशलगढ़, बांसवाड़ाचे २ ते १३ वर्षाचे १० मुलं कोरोनाने बाधित झाल्याने येथे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये २, ४ आणि ५ वर्षाच्या तीन मुली तर ६ ते १३ वर्षांच्या मुलांमध्ये ५ मुलं आणि २ मुलींचा समावेश आहे.

या सर्व लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या मुलांना त्यांच्या कुटुंबियांपासून दूर ठेवल्याने या सर्व मुलांना रूग्णालयातच आपल्या आई-वडिलांपासून लांब रहावे लागत असल्याने ते चिडचिड करत आहे. कोरोनाचे संकंट देशावर ओढावले असताना मोठ्यांपासून लहान मुलांच्या मनात देखील या व्हायरसची भीती बसली आहे. हे लहान मुलं कोरोनाने बाधित झाल्याने त्यांना ब्लड प्रेशर, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, झोप न लागणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

मुलांच्या मनातून कोरोनाबद्दलची भिती दूर करण्यासाठी रूग्णालयातील डॉक्टरांनी अनोखी युक्ती करत ते आनंदी कसे राहतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यावेळी डॉक्टर लहान मुलांच्या वयाचे होत त्यांच्यासह अनेक खेळ खेळले. यामध्ये अंताक्षरी आणि इतर खेळ खेळून ते कसे आनंदी राहतील याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. मुलांना आनंदी ठेवण्यासाठी कोरोना वॉर्डमधील डॉक्टरसह अन्य स्टाफ लहान मुलांसह खेळ खेळत आहेत, यामुळे त्यांचे आरोग्य स्वस्थ आणि आनंदी राहण्यास मदत होत आहे, असे रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. आरएल सुमन यांनी सांगितले.


Corona: प्लाझ्मा उपचार पद्धतीने बरा झाला दिल्लीचा पहिला कोरोना रूग्ण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -