घरताज्या घडामोडीRussia Ukraine Crisis: युक्रेन हल्ला निषेध प्रस्तावावर भारत तटस्थ, चीनचा सावध पवित्रा

Russia Ukraine Crisis: युक्रेन हल्ला निषेध प्रस्तावावर भारत तटस्थ, चीनचा सावध पवित्रा

Subscribe

रशिया युक्रेनवर केलेला हल्ला रोखण्यासाठी आणि सैनिक माघारी परतण्यासाठीच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काल, शुक्रवारी मतदान झाले. यावेळी रशियाने या प्रस्तावावर मतदान केले. पण भारत, चीन आणि युएईने हल्ल्याचा निषेध करत मतदानात भाग घेतला नसून तटस्थ भूमिका घेतली आहे. तसेच हिंसाचाराचा विरोध करण्यात आले आहे. दरम्यान या युद्धात चीन रशियाला पाठिंबा देत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनने सावध पवित्रा घेतला आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेन हल्ल्याविरोधात सादर केलेल्या प्रस्तावाच्या समर्थनार्थ १५ पैकी ११ सदस्य देशांनी मतदान केले. तसेच रशियाने या प्रस्तावाविरोधात वीटोचा वापर केला. रशिया हा प्रस्ताव फेटाळण्यासाठी वीटोचा वापर करेल, याचा सगळ्यांना अंदाज होता. दरम्यान यामध्ये भारत, चीन आणि यूएईने मतदानात भाग घेतला नाही. तर पाश्चात्य देशांनी सांगितले की, ‘हा प्रस्ताव म्हणजे युक्रेनविरुद्ध आक्रमकता आणि कारवाईसाठी रशियाला जागतिक स्तरावर एकाकी पडल्याचे दाखवण्याचा प्रयत्न आहे.’

- Advertisement -

सुरक्षा परिषदेत भारताचे प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती म्हणाले की, ‘युक्रेनमध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे भारत खूप चिंतेत आहे. हिंसा आणि शत्रुत्व त्वरित संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जावेत अशी आमची विनंती आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अजूनपर्यंत कोणताही उपाय शोधण्यात आलेला नाही. आम्ही भारतीय जनतेच्या कल्याणाबाबत आणि सुरक्षिततेबाबत चिंतेत आहोत, यात युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी सामील आहेत. हे खेदजनक आहे की, मुत्सदेदगिरीचा मार्ग सोडला गेला. आपल्याला पुन्हा त्यावर परतावे लागेल. या सर्व कारणांमुळे भारताने या प्रस्तावापासून दूर राहणे पसंत केले आहे.’

संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचे राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड म्हणाले की, ‘आमच्या मूलभूत तत्त्वांवर रशियाचा हल्ला हा निर्लज्ज आहे. हा आमच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला धोका आहे.’

- Advertisement -

दरम्यान रशिया विरोधातील प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, अल्बानिया, ब्राझील, गॅबॉन, घाना, आयरलँड, केन्या, मॅक्सिको आणि नॉर्वे आहेत.


हेही वाचा – एअरलिफ्टची रणनीती तयार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -