घरताज्या घडामोडीIndia Corona Update: देशातील रुग्णसंख्येत मोठी घट; २४ तासांत ११,४९९ नव्या रुग्णांची...

India Corona Update: देशातील रुग्णसंख्येत मोठी घट; २४ तासांत ११,४९९ नव्या रुग्णांची वाढ, २५५ जणांचा मृत्यू

Subscribe

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे. काल, शुक्रवारी देशात १३ हजार १६६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली होती आणि ३०२ जणांचा मृत्यू झाला होता. देशात आज कालच्या आकडेवारीच्या तुलनेत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत १ हजार ६६७ने घट झाली आहे. तर मृत्यूच्या संख्येत ४७ने घट झाली आहे. देशात २४ तासांत ११ हजार ४९९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून २५५ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.

देशात सध्या १ लाख २१ हजार ८८१ सक्रीय रुग्ण आहेत. देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर १.०१ टक्के इतका आहे. आतापर्यंत देशात १ अब्ज ७७ कोटी १७ लाख ६८ हजार ३७९ लसीकरण झाले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ४ कोटी २९ लाख ०५ हजार ८४४
देशातील एकूण मृत्यूची संख्या – ५ लाख १३ हजार ४८१
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ४ कोटी २२ लाख ७० हजार ४८२
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – १ लाख २१ हजार ८८१
देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या – ७६ कोटी ५६ लाख ३० हजार ६५८
देशातील एकूण लसीकरण – १ अब्ज ७७ कोटी १७ लाख ६८ हजार ३७९

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात १ हजारापेक्षा कमी रुग्ण आढळत आहे. काल, शुक्रवारी महाराष्ट्रात ९७३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर १२ जणांचा मृत्यू झाला. तसेच २ हजार ५२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या महाराष्ट्रात ८ हजार ६८८ सक्रीय रुग्ण आहेत.


हेही वाचा – DDMA Guidelines Today : दिल्लीत कोरोना निर्बंध शिथील: नाईट कर्फ्यू हटवला, काय आहेत नवे नियम?


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -