घरदेश-विदेशIndia - Canada : भारतावरील ट्रुडोंच्या आरोपांना अमेरिकेकडून जोरदार उत्तर; म्हटले...

India – Canada : भारतावरील ट्रुडोंच्या आरोपांना अमेरिकेकडून जोरदार उत्तर; म्हटले…

Subscribe

India Canada : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येनंतर भारत (India) आणि कॅनडा (Canada) यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला होता, मात्र भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांनी कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेले आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हणत फेटाळून लावले होते. आता या प्रकरणात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. (India Canada Strong response from America to Trudeaus accusations against India)

हेही वाचा – Narendra Modi : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा झंझावाती दौरा; 4 राज्यांमध्ये घेणार जाहीर सभा

- Advertisement -

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, कॅनडाच्या आरोपांबद्दल आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी संबंधित सुरू असलेल्या तपासाबाबत भारत स्वत: बोलू शकतो. अमेरिकेने भारताला कॅनडाच्या तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मॅथ्यू मिलर यांना विचारण्यात आले की, कॅनडाच्या तपासात सहकार्य करण्याच्या अमेरिकेच्या आवाहनाबद्दल भारत सरकारने काय म्हटले? या प्रश्नाला त्यांनी उत्तर देणे टाळले. त्यांनी म्हटले की, भारत स्वत:साठी बोलू शकतो. मी खाजगी राजनैतिक संभाषणांबद्दल बोलणार नाही.

भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्यात कॅनडा मुद्द्यावर चर्चा होईल का?असा प्रश्न अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याला विचारले असता, ते म्हणाले की, या दोघांमध्ये काय चर्चा होईल हे मी जाहीरपणे सांगू शकत नाही. असे म्हणत त्यांनी भारत आणि कॅनडा मुद्दावर स्पष्ट बोलणे वारंवार टाळले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘भारत शत्रू देश’; PCB अध्यक्ष जका अशरफ यांनी भारताविरोधात ओकली गरळ

भारताने कॅनडाला तपासात सहकार्य करावे

यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन म्हणाले होते की, कॅनडाच्या पंतप्रधानांनी निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. मात्र या आरोपांबद्दल अमेरिकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यांनी म्हटले की, आमच्या दृष्टिकोनातून कॅनडाने हरदीप निज्जरच्या तपास पुढे जाणे महत्त्वाचे आहे. या तपासात भारताने कॅनडासोबत जवळून काम करणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या कॅनडाने हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या दाव्याचे समर्थन करणारे कोणतेही सार्वजनिक पुरावे दिलेले नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -