घरदेश-विदेशचकमकीनंतर वादाची धुमश्चक्री!

चकमकीनंतर वादाची धुमश्चक्री!

Subscribe

राहुल यांचा सवाल : सीमेवर घुसखोरी झाली नाही तर भारताचे २० सैनिक शहीद कसे?, पंतप्रधान कार्यालय : सैनिकांच्या शौर्यामुळे सीमेवर घुसखोरी झाली नाही, असे मोदींना म्हणायचे होते.

भारत-चीन चकमकीनंतर आता भारतात वादाची धुमश्चक्री उडाली असून विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरले आहे.‘सीमेवर घुसखोरी झाली नाही तर भारताचे २० सैनिक शहीद कसे झाले? असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. यावर पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) तातडीने खुलासा शनिवारी करण्यात आला. १५ जूनला चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला भारतीय सैन्याने जोरदार उत्तर दिल्याने सीमेवर घुसखोरी झाली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हणायचे होते. मात्र, विरोधक त्याचा चुकीचा अर्थ लावून वाद निर्माण करत आहेत, असा खुलासा पंतप्रधान कार्यालयाने केला आहे.

शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मोदी म्हणाले होते की,‘लडाखच्या सीमेत कोणतीच घुसखोरी झाली नाही आणि आपल्या पोस्टवरही कोणी कब्जा केला नाही.’ यावर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधानांचे हे विधान खरे आहे, तर मग भारताचे २० जवान शहीद कसे झाले? दोन्ही देशात चर्चा का होत आहेत? पंतप्रधानांनी चीनच्या हल्ल्यापुढे सरेंडर केले आहे, अशी बोचरी टीका राहुल यांनी केली.

- Advertisement -

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी १५ जूनच्या चकमकीचा संदर्भ दिला होता. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, सैनिकांच्या शौर्यामुळे भारताच्या सीमेत कोणीच घुसले नाही. आपल्या सैनिकांनी प्राण देऊन चिनी सैनिकांना हुसकून लावले. पण, विरोधी पक्षांना राजकारण करायचे आहे, असे पीएमओने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -