घरCORONA UPDATEDCGI ची Sputnik Light च्या सिंगल डोस वापराला आपत्कालीन मंजूरी, भारताकडे कोरोनाविरोधी...

DCGI ची Sputnik Light च्या सिंगल डोस वापराला आपत्कालीन मंजूरी, भारताकडे कोरोनाविरोधी लढ्यासाठी नववे हत्यार

Subscribe

भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळालेली ही नववी लस आहे. त्यामुळे आता कोरोना विरोधात लढण्यासाठी देश आणखी सक्षम झाला आहे.

भारतात कोरोना महामारीचा कहर सुरूच आहे. देशात कोरोना विरोधी लसीकरणाच्या अभियानाला देखील वेग आला आहे.  कोरोना विरोधात लढण्यासाठी आतापर्यंत भारताकडे एकूण ८ लसी आहेत. त्यात आता आणखी एका लसीचा समावेश झाला असून DCGI ने रशियाच्या सिंगल डोस स्पुतनिक लाईट (Sputnik Light)  लसीला भारतात आपत्कानील वापरासाठी मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता कोरोना विरोधातील लढाई जिंकण्यासाठी भारताकडे नववे हत्यार आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ, मनसुख मंडाविया यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, DCGI ने भारतात सिंगल डोस स्पुतनिक लाइटला आपत्कानील वापरासाठी मंजूर दिली आहे. भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळालेली ही नववी लस आहे. त्यामुळे आता कोरोना विरोधात लढण्यासाठी देश आणखी सक्षम झाला आहे. रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीला देखील २०२१मध्ये आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली होती.

- Advertisement -

द लँसेंटच्या रिपोर्टनुसार, स्पुतनिक लाइट ही लस कोरोना विरोधात लढण्यासाठी ७८.६ – ८३.७ टक्के सक्षम आहे. कोरोनाच्या इतर लसींच्या तुलनेत ही लस जास्त प्रभावशाली असल्याचे म्हटले जात आहे. स्पुतनिक लाइट लस घेतल्याने कोरोना बाधित रुग्णांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची शक्यता ८२.१ – ८७.६ टक्क्यांनी कमी होते.

- Advertisement -

स्पुतनिक लाइटला मंजुरी मिळाल्याने ही लस भारतातील पहिली सिंगल डोस लस म्हणून ओळखली जाणार आहे.  स्पुतनिक व्हीनंतर रशियाने स्पुतनिक लाइट अशी सिंगल डोस देण्यात येणारी लस जगासमोर आणली.


हेही वाचा –  India Corona Update : देशात 1 लाख 27 हजार नव्या कोरोना रुग्णांची…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -