घरताज्या घडामोडीCorona in India : देशात गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजारांहून...

Corona in India : देशात गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजारांहून अधिक नवे रुग्ण, ४,१०६ जणांचा मृत्यू

Subscribe

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरु असताना बाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी घट होताना दिसत आहे. तर गेल्या काही दिवसात नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याची नोंद करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आजच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोनाबाधित आढळले असून ४ हजार १०६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ लाख ७८ हजार ७४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisement -

देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ४९ लाख ६५ हजार ४६३ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख ७४ हजार ३९० जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ११ लाख ६५ हजार ४६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात सध्या ३६ लाख १६ हजार ९९७ इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात कोरोना लसीकरण देखील सुरू आहे. आतापर्यंत देशात १८ कोटी २९ लाख २६ हजार ४६० जणांचे लसीकरण पार पडले आहे.

- Advertisement -

दरम्यान, १६ मेपर्यंत ३१ कोटी ६४ लाख २३ हजार ६५८ नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी रविवारी दिवसभरात १५ लाख ७३ हजार ५१५ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असल्याची माहिती आयसीएमआरने दिली. दरम्यान, राज्यात एकाबाजूला नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होतेय आणि कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कोरोना मृतांची संख्या वाढतच आहे. मागील २४ तासांत राज्यात ३४ हजार ३८९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ९७४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५३ लाख ७८ हजार ४५२ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८१ हजार ४८६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ४ लाख ६८ हजार १०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -