घरदेश-विदेशInternational Flight : अखेर १५ डिसेंबरपासून भारतातील आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु

International Flight : अखेर १५ डिसेंबरपासून भारतातील आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु

Subscribe

कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमाम सेवा अखेर सुरु होणार आहे, त्यामुळे नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त परदेशात जाणाऱ्या प्रवाशांचा मार्ग सुखकर होणार आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने १४ देश वगळता इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने केंद्रीय गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर विमान वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

यामुळे आत्ता भारतातून १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सेवा सुरळीत होणार आहे. यामुळे १५ डिसेंबरपासून ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स. फिनलँड, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन, मॉरिशस, सिंगापूर, बांगलादेश, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे आणि न्यूझीलँड सह १४ देश वगळता इतर देशांमध्ये नियमितपणे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. या १४ देशांमसह काही देशांमध्ये एअर बबल करारातंर्गत विमान सेवा सुरू आहे.

- Advertisement -

कोरोना महामारीमुळे देशात २२ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंदी घालण्यात आली. यानंतर ही बंदी ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. मात्र काही महिन्यांनंतर ‘वंदे भारत विमान सेवा’ आणि ‘एअर बबल’ नियमांनुसार काही देशांमध्ये आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्यात आली. दरम्यान देशांतर्गत विमानसेवाही काही दिवसांपूर्वी काही नियम आणि निर्बंधासह पुन्हा सुरू करण्यात आली. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पूर्ण क्षमतेसह विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.

- Advertisement -

सध्या ‘एअर बबल’ व्यवस्थेमार्फत भारत ५ हून अधिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा चालवतोय. मात्र भारत आणि त्या देशांमधील विमान कंपन्या काही अटींचे पालन करुनच विमानांचे उड्डाण करू शकतात.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -