घरक्रीडाIPL 2022 Auction : संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सने १४ कोटींमध्ये केले रिटेन;...

IPL 2022 Auction : संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सने १४ कोटींमध्ये केले रिटेन; या खेळाडूंच्या नावांचीही चर्चा सुरू

Subscribe

इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची लिलाव प्रक्रिया जवळ आल्याने फ्रँचायझींनी मेगा लिलावापूर्वी त्यांना कायम ठेवू इच्छित असलेल्या खेळाडूंची यादी सादर करणे सुरू केले आहे

इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची लिलाव प्रक्रिया जवळ आल्याने फ्रँचायझींनी मेगा लिलावापूर्वी त्यांना कायम ठेवू इच्छित असलेल्या खेळाडूंची यादी सादर करणे सुरू केले आहे. नियमानुसार प्रत्येक फ्रँचायझीला संघातील जुने जास्तीत जास्त ४ खेळाडू रिटेन करण्याची परवानगी आहे. राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला आपला पहिला खेळाडू म्हणून कायम ठेवले आहे. संघातील बाकीच्या जागांसाठी कोणते खेळाडू कायम ठेवणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान सर्व फँचायझींना रिटेन केलेल्या खेळांडूची यादी ३० नोव्हेंबर पर्यंत देणे आवश्यक आहे.

माहितीनुसार राजस्थान रॉयल्सने कर्णधार संजू सॅमसनला कायम ठेवले आहे आहे. राजस्थानच्या फ्रँचायझीने त्याला १४ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. फ्रँचायझीला सॅमसनला १६ कोटींमध्ये राखून ठेवायचे असले तरी तो केवळ १४ कोटींमध्येच तयार झाला आहे. राजस्थान रॉयल्सने कायम ठेवलेला संजू सॅमसन हा पहिला खेळाडू आहे.

- Advertisement -

संजू सॅमसनचा राजस्थान रॉयल्सच्या संघात २०१८ साली ८ कोटी रुपयांनी समावेश झाला होता. त्याचप्रमाणे आयपीएलच्या १४ व्या हंगामात त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र कर्णधार म्हणून तो फारसा यशस्वी ठरला नाही आणि आपल्या संघाला स्पर्धेच्या पात्रता फेरीपर्यंत देखील पोहचवू शकला नाही. पण फलंदाज म्हणून मागच्या सत्रात त्याने खूप चमकदार कामगिरी केली आहे. आयपीएल २०२१ मध्ये त्याने १३७ च्या स्ट्राइक रेटने ४८४ धावा केल्या आहेत.

या खेळांडूच्या नावांची चर्चा

संजू सॅमसनला रिटेन केल्यानंतर आता संघाकडून आणखी ३ खेळांडूना रिटेन करण्याची आवश्यकता आहे. फ्रँचायझीमध्ये लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांच्या नावाची चर्चा होत आहे. आता यापैकी कोणत्या खेळाडूकडे फ्रँचायझी लक्ष देते हे पाहावे लागेल. लक्षणीय म्हणजे बेन स्टोक्सबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.

- Advertisement -

हे ही वाचा: IND vs SA Series: भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कोरोनाचे सावट; नव्या विषाणूने वाढवले टेंशन


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -