घरदेश-विदेशभारताने भरला पाकला दम; आमच्या पायलटला सुखरूप परत पाठवा

भारताने भरला पाकला दम; आमच्या पायलटला सुखरूप परत पाठवा

Subscribe

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय हवाई दलातील पायलटला तत्काळ आणि सुखरूपपणे भारताच्या हवाली करण्यात यावे, अशा भारताने पाकिस्तानला दम भरला आहे.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय हवाई दलातील पायलटला तत्काळ आणि सुखरूपपणे भारताच्या हवाली करण्यात यावे, अशा स्पष्ट शब्दांत भारताने पाकला बजावले आहे. दरम्यान, पाकचे भारतातील उप उच्चायुक्त सय्यद हैदर शाह यांना परराष्ट्र मंत्रालयाने आज सायंकाळी बोलावून घेतले. यावेळी पाकने केलेल्या हवाई हल्ल्याच्या प्रयत्नांवर भारताने आपला तीव्र आक्षेप नोंदवला. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. त्यात पाकच्या ताब्यात असलेल्या भारतीय पायलटला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची हमी पाकने द्यायला हवी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच पायलटला ताब्यात घेतल्याची बामती पाकिस्तानने दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तिनही सेनादलांच्या प्रमुखांची बैठक बोलावली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत आपल्या पायलटला सुखरूप परत आणण्याबाबत सेनादलांना पतंप्रधानांनी मोकळीक दिल्याचे समजते.

पायलटचा फोटो जारी करणे मानवतेच्या विरुद्ध 

भारतीय पायलटचा जखमी अवस्थेतील फोटो पाककडून जारी करण्यात आला आहे. यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. हे सरळसरळ आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे आणि जीनेव्हा परिषदेतील ठरावाचे उल्लंघन आहे, असे भारताने पाकला ठणकावून सांगितले आहे. दरम्यान, पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर हवाई हल्ला चढवला होता. या हल्ल्याने बिथरलेल्या पाकने आज भारतावर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताने हा प्रयत्न उधळून लावला. या कारवाईत पाकचे एक विमान पाडले गेले तर भारतालाही एक विमान गमवावे लागले. पाकच्या हद्दीत पडलेल्या या भारतीय विमानाच्या पायलटला पाकने ताब्यात घेतल्याने स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -