घरदेश-विदेशबिकानेरमध्ये मिग- २१ लढाऊ विमान कोसळले; पायलट सुखरुप

बिकानेरमध्ये मिग- २१ लढाऊ विमान कोसळले; पायलट सुखरुप

Subscribe

मिग - २१ विमान कोसळण्याची ही पहिली घटना नाही. या आधी देखील, मिग - २१ विमानाला अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

राजस्थानच्या बिकानेरमध्ये भारतीय वायुदलाचे विमान कोसळले. मिग – २१ या विमानाला अपघात झाला असून सुदैवाने या अपघातात पायलट वाचला. हे विमान बिकानेरच्या रिहायशी भागात शेतात कोसळले. असे सांगितले जात आहे की, लढाऊ विमान मिग – २१ हे विमान कोसळण्याआधी पालयटने पॅराशूट घेऊन उडी मारली त्यामुळे तो वाचला आहे. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतिही जिवितहानी झाली नाही.

- Advertisement -

असे सांगितले जात आहे की, राजस्थान बिकानेरच्या नाल एअर बेसवरुन या विमानाने उड्डाण घेतले होते. उड्डाण घेतल्यानंतर या विमानाला एक पक्षी येऊन धडकला आणि विमान कोसळले. मिग – २१ विमान कोसळण्याची ही पहिली घटना नाही. या आधी देखील, मिग – २१ विमानाला अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मिग- २१ विमानावरुन सवाल उपस्थित केले जात आहे. नुकता जुलै २०१८ मध्ये हिमाचलच्या कांगडामध्ये मिग – २१ विमान कोसळले. या अपघातामध्ये विमानातील पायलट मीत कुमार यांचा मृत्यू झाला होता.

राजस्थानच्या बिकानेरमध्ये भारतीय वायुदलाचे मिग- २१ विमान अशावेळी कोसळले. जेव्हा भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे. २७ फेब्रुवारी भारतीय वायुसेनेचे विमंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग – २१ या लढाऊ विमानाच्या सहाय्याने पाकिस्तानच्या एफ- १६ हे लढाऊ विमान पाडले होते.

- Advertisement -

हेही वाचा – 

Live Update – भारताच्या लढाऊ विमानाचा अपघात, पायलट शहीद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -