घरमनोरंजनपाँडेचेरीच्या ट्रीपनंतर सई करतेय 'हे' काम

पाँडेचेरीच्या ट्रीपनंतर सई करतेय ‘हे’ काम

Subscribe

काही दिवस सोशलमिडीयावरून दूर असलेल्या सईने दमदार कमबॅक केलं आहे. तीने आपले क्लासी बॉस बेब लूक फोटो शेअर केले आहेत. लवकरच ती आपल्या आणखी काही खस आठवणी चाहत्यांबरोबर शेअर करणार आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावरून स्वत:ला डिलीट केलं होतं. ती डिजीटल डिटॉक्सवर गेल्याने तिच्या चाहत्यांना खूप आश्चर्य वाटलं. आता ती परत कधी येणार याची चाहते आतुरतेने वाट बघत होते. एक महिना डिजीटल डिटॉक्सवर गेलेल्या सईने या दरम्यान पाँडेचरीला जाऊन सचिन कुंडलकरांच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण केले. नुकतीच सई पाँडेचरीवरून मुंबईत परत आली आणि सोशल मीडियवरही परतली आहे. सोशल मीडियवर परतताच सईने एक छान ‘क्लासी बॉस बेब’ फोटोशूट केलं आहे.

 

View this post on Instagram

 

आले परत! #saitamhankar #goodtobeback #backtothebay #missedyouall #nicebreak #muchneeded

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

 सई ताम्हणकर सोशल मीडियावर परतल्यावर चाहत्यांना खूप मीस केलं असं सईने म्हटलं आहे. सई म्हणाली, “हो, मी आता पाँडेचरीवरून आणि सोशल मीडिया डिटॉक्सवरूनही एका महिन्यांनी मुंबईत परतलेय. माझ्या सोशल मीडिया डिटॉक्सचा मला शुटिंगला खूप फायदा झाला. पण सोशल मीडियामूळे चाहत्यांशी रोजच्या रोज संपर्कात असण्याची सवय असल्याने मी चाहत्यांना खूप मिस केले. या एका महिन्यात खूप काही घडलंय. मी पाँडेचरीत काय-काय केले ते लवकरच मी चाहत्यांसोबत सोशल मीडियावरूनही शेअर करेनच.”

- Advertisement -

 सईच्या या सोशल मीडिया पोस्टलाही तिच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या पोस्टनंतर सईचे बॉस बेब लुकमधले फोटोमिडीयावर झळकू लागले. फोटोशूटविषयी सई ताम्हणकर म्हणते, “फोटोशूट करणं, किंवा शुटिंग करणं हा माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. आता डिजीटल डिटॉक्सनंतर मी पून्हा नव्या जोमाने परतलीय. परतताना, लक्षात येतंय, की, सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग असला, आणि ते आमच्या सारख्या अभिनेत्यांसाठी आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट करायचं एक वरदान असलं. तरीही कधीतरी यातून ब्रेक घेऊन आयुष्यातले नव्या अनुभवांना सामोरे जाणे गरजेचे आहे.

Sai Tamhankar
सईचा ‘क्लासी’ लूक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -