घरताज्या घडामोडीRepublic Day 2022: भारतीय लष्कराची शस्त्रास्त्र अन् गणवेशाची दशकांची परंपरा परेडमध्ये झळकणार

Republic Day 2022: भारतीय लष्कराची शस्त्रास्त्र अन् गणवेशाची दशकांची परंपरा परेडमध्ये झळकणार

Subscribe

भारतीय सेनेच्या सहा मार्चिंग तुकड्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये होणाऱ्या राजपथावर नवीन गणवेशासह दिसणार आहेत. यामध्ये एकूण १६ मार्चिंग दल असणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय सशस्त्र दलाच्या ८ तुकड्या असतील. यामध्ये ६ भारतीय सेना, वायुसेना आणि नौदलाचे प्रत्येकी एक, केंद्रीय सशस्त्र पोलिसांच्या चार तुकड्या, एनएसएसकडून एक आणि नॅशनल कॅडेट कोरमधून कॉर्प्सचे दोन संघ असल्याची माहिती दिल्ली विभागाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल आलोक काकर यांनी दिली आहे.

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, भारतीय सेना परेडमध्ये दशकांच्या दरम्यान गणवेश आणि हत्यारांची निर्मिती कशी झाली होती, हे दाखवणार आहेत. भारतीय सेना तीन दशकांपासून घालत आलेला गणवेश परिधान करणार आहेत. याशिवाय ऑलिव्ह ग्रीन वर्दी आणि यंदाच्या वर्षातील अनावरण करण्यात आलेला नवीन गणवेश परिधान करण्यात येणार आहे. तसेच हा गणवेश परेडमध्ये दाखवता येणार आहे.

- Advertisement -

राजपूत रेजिमेंटची पहिली तुकडी १९५० च्या दशकातील गणवेश परिधान करणार आहे. तसेच ३०३ रायफलसह ते परेडमध्ये दिसणार आहेत.

असम रेजिमेंटची दुसरी तुकडी १९६० च्या दशकातील गणवेश परिधान करणार आहे. तसेच ३०३ रायफलसह ते परेडमध्ये दिसणार आहेत.

- Advertisement -

जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्रीचे कर्मचारी १९७० च्या दशकातील गणवेश परिधान करतील आणि ७.६२ मिमी रायफलसह ते परेडमध्ये दिसणार आहेत.

शिख लाइट इन्फंट्री आणि आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सचे कर्मचारी INSAS रायफल्ससह विद्यमान ऑलिव्ह ग्रीन युनिफॉर्ममध्ये परेडमध्ये दिसतील.

सहावी तुकडी पॅराशूट रेजिमेंटच्या जवानांची असणार आहे. हे जवान नवीन गणवेश परिधान करणार आहेत.

प्रत्येक मार्चिंग तुकडीमध्ये नेहमीच्या १४४ ऐवजी ९६ सैनिकांचा समावेश असणार आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुरक्षेसाठी २७ हजारांपेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आल्याची माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिलीय. पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि निरीक्षक, उपनिरीक्षक रँकच्या अधिकाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.


हेही वाचा : Viral Video : राष्ट्रगीता दरम्यानच्या कृत्याने विराट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय आहे प्रकरण ?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -