घरताज्या घडामोडीCorona In India: देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत सलग तिसऱ्या दिवशी घट, मात्र दैनंदिन...

Corona In India: देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत सलग तिसऱ्या दिवशी घट, मात्र दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट वाढला

Subscribe

देशात सध्या २२ लाख ४९ हजार ३३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात सलग तिसऱ्या दिवशी दैनंदिन नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र दुसऱ्याबाजूला दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढला आहे. काल, रविवारी देशात २४ तासांत ३ लाख ३३ हजार ५३३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली होती आणि दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट १७.७८ टक्के इतका झाला होता. आज कालच्या तुलनेत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत २७ हजार ४६९ घट होऊन ३ लाख ६ हजार ६४ रुग्णांची नोंद झाली आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट २०.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासांत ४३९ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख ४३ हजार ४९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या २२ लाख ४९ हजार ३३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत १४ लाख ७४ हजार ७५३ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ७१.६९ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशातील पॉझिटिव्हीटी रेट १७.०३ टक्के असून रिकव्हरी रेट ९३. ०७ टक्के आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या – ३ कोटी ९५ लाख ४३ हजार ३२८
देशातील एकूण मृत्यूची संख्या – ४ लाख ८९ हजार ८४८
देशातील एकूण रुग्ण बरे झालेल्यांची संख्या – ३ कोटी ६८ लाख ४ हजार १४५
देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या – २२ लाख ४९ हजार ३३५
देशातील एकूण चाचण्याची संख्या – ७१ कोटी ६९ लाख ९५ हजार ३३३
देशातील एकूण लसीकरणाची संख्या – १ अब्ज ६२ कोटी२६ लाख ७ हजार ५१६

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Variant: चिंताजनक! तीन आठवड्यापूर्वीच मुंबईत ओमिक्रॉनच्या सामूहिक संसर्गाला सुरुवात – टास्क फोर्स


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -