घरदेश-विदेशख्रिस्ती आर्चबिशप यांचा मोदींविरोधात शड्डू

ख्रिस्ती आर्चबिशप यांचा मोदींविरोधात शड्डू

Subscribe

लोकशाही वाचविण्याचे आवाहन

कर्नाटक निवडणुकांचा धुरळा आता जमिनीवर आला असून राजकीय पक्षांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. देशातील राजकीय, सामाजिक परिस्थिती बदलत आहे. भारतातील लोकशाहीला धोका असल्याने देशासाठी प्रार्थना करा, असे आवाहन दिल्लीचे आर्चबिशप अनिल काउटो यांनी केल्याने आता ख्रिश्चन समुदायाचाही पंतप्रधान मोदींना विरोध असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काउटो यांनी राजधानी दिल्लीतील सर्व चर्चना लोकशाही वाचवा, अशा आशयाचे पत्र पाठवले आहे.

काउटो यांच्या पत्रामुळे भाजपाचे नेते अस्वस्थ झाले असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ‘सध्या देशात राजकीय अशांतता पसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे लोकशाही राज्यघटना धोक्यात असल्याचे काउटो यांचे म्हणणे आहे. ‘२०१९ मधील निवडणुकांसाठी सर्व फादर्सनी प्रार्थना आणि शुक्रवारी उपवास करावा. आपला देश आणि राजकीय नेत्यांसाठी प्रार्थना करणे ही आपली परंपरा आहे. परंतु, आता येत्या निवडणुकांसाठी ही प्रार्थना वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे २०१९ मध्ये आपल्याला नवे सरकार मिळेल. त्यासाठी आत्तापासून देशासाठी प्रार्थना सुरू करूया’, असे आवाहन आर्चबिशप काउटो यांनी पत्राद्वारे केले आहे.

- Advertisement -
काउटो यांचे पत्र
आर्चबिशप अनिल काउटो

देशाच्या व्यवस्थेमध्ये बिशपांचा हस्तक्षेप नको


काउटो यांच्या पत्रामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चांगलाच संतापला आहे. हे पत्र म्हणजे भारतीय धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीवर चर्चचा हल्ला असल्याचे ट्वीट संघ स्वयंसेवक राकेश सिन्हा यांनी केले आहे. देशाच्या व्यवस्थेमध्ये बिशपांचा हस्तक्षेप नको असेही त्यांचे म्हणने आहे.

- Advertisement -

आर्चबिशप कार्यालयाकडून खुलासा
आर्चबिशप काउटो यांनी लिहिलेल्या पत्रात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नाही. ‘नवे सरकार’ या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. प्रत्येक निवडणुकीनंतर येणारे सरकार हे नवेच असते. पण जाणीवपूर्वक त्याला वेगळा रंग दिला जात आहे, असा खुलासा फादर रॉड्रिग्स यांनी टीओआयकडे केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -