घरमुंबईआईला त्रास देणाऱ्या मुलांना घरात प्रवेश नाही!

आईला त्रास देणाऱ्या मुलांना घरात प्रवेश नाही!

Subscribe

वयोवृद्ध आईवडिलांचे पालन पोषण करण्याकडे अनेकदा मुलांकडून दुर्लक्ष केले जाते. वेळप्रसंगी त्यांना वृद्धाश्रमात पाठवले जाते. अशा वयोवृद्ध आई वडिलांना न्यायालयाच्या एका निकालामुळे दिलासा मिळाला आहे. आईला त्रास देणाऱ्या, मारहाण करणाऱ्या मुलांना घरात प्रवेश करण्याचा कोणताच अधिकार नसेल, असा कडक आदेशच सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

आईला त्रास द्याल तर घरातून बाहेर पडाल

- Advertisement -

दक्षिण मुंबईतील एका इसमाने त्यांच्या ७२ वर्षीय आईच्या घरात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला.  या बाईचा हा मुलगा त्याच्या बायको आणि पत्नीसह घरात घुसू पाहत होता. यावर ईलाज म्हणून आईने त्या घराचे कुलूपच बदलून टाकले. त्यामुळे मुलाने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान जो मुलगा आईला त्रास देत असेल किंवा मारहाण करत असेल आणि त्याची वागणूक चांगली नसेल तर त्याला आपल्या आईच्या घरात प्रवेश करण्याचा कोणताच अधिकार राहणार नाही, असे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शाहरुख कथावल्ला यांनी दिले.

यावेळी ७२ वर्षीय महिलेने न्यायालयासमोर सांगितले की, त्यांचा मुलगा त्यांना चांगली वागणूक देत नव्हता, याच त्रासाला कंटाळून त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर त्यांना न्याय मिळाला आहे. आता त्या आपल्या घरात राहू शकतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी त्यांना सुरक्षा दिली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -