घरदेश-विदेशभारतीय बनावटीच्या तेजसचे उड्डाण

भारतीय बनावटीच्या तेजसचे उड्डाण

Subscribe

संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ या हलक्या लढाऊ विमानाला अंतिम परवानगी मिळाल्यानंतर दुसर्‍या दिवशी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी ‘तेजस’मधून उड्डाण केले. बंगळुरू येथे भरलेल्या ‘एरो-इंडिया २०१९’ या लढाऊ विमानांच्या प्रदर्शनात हे उड्डाण करण्यात आले. ‘तेजस’ हे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सहभागी होणे हे ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेचे मोठे यश मानले जाते.

‘तेजस’मधून उड्डाण हा आयुष्याचा एक मोठा अनुभव होता. हे विमान खूपच चांगले आहे. त्याचे लक्ष्य भेदणेही चांगले आहे. भारतीय लष्करात ‘तेजस’च्या सहभागामुळे देशाच्या हवाई शक्तीत नक्कीच वाढ होईल, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सांगितले. बुधवारी ‘तेजस’ विमानाला संरक्षण सचिव आर अ‍ॅण्ड डी आणि डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतिश रेड्डी यांनी अंतिम परवानगी दिली.

- Advertisement -

शस्त्र निर्माण करणारी देशातील सरकारी कंपनी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने तेजसची निर्मिती केली आहे. फायटर जेटमध्ये उड्डाणापूर्वी रावत यांनी उपस्थित अधिकारी आणि लोकांना हात दाखवत अभिवादन केले. मिलिटरी एव्हिएशन रेग्युलेटरने तेजसला अंतिम मंजुरी दिली. आता या लढाऊ विमाना भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात समावेश होईल. हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांच्याकडे बुधवारी एरो-इंडिया शोदरम्यान मंजुरीबाबतचा दाखला सुपूर्द करण्यात आला. तेजस या लढाऊ विमानाचा हवाई दलात होणारा समावेश म्हणजे ’मेक इन इंडिया’ या अभियानाचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -