घरदेश-विदेशनेपाळमध्ये भारतीय औषधांना बंदी; जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानंतर निर्णय

नेपाळमध्ये भारतीय औषधांना बंदी; जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानंतर निर्णय

Subscribe

काही भारतीय कंपन्यांनी नेपाळमध्ये औषधे निर्यात करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार नेपाळचे एक पथक औषध कंपन्यांच्या मानांकनाची तपासणी करण्यासाठी भारतात आले होते. काही कंपन्या मानांकनाच्या निर्देशांचे पालन करत नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळेच भारतीय औषध कंपन्यांना नेपाळमध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्लीः नेपाळमध्ये १६ भारतीय औषध कंपन्यांना बंदी करण्यात आली आहे. यामध्ये बाबा रामदेव यांच्या काही उत्पादनांचाही समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानंतर नेपाळ सरकारने हा निर्णय घेतला.

पश्चिम आफ्रिकन देशातील गॅम्बियामध्ये ६६ बालकांचा कफ सिरप प्यायल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. जागतिक आरोग्य संघटनेने औषधांच्या मानाकंनाबाबत काही निर्देश जारी केले होते. तसेच भारतात तयार होणारे काही सिरप न वापरण्याचा सल्ला दिला होता. काही भारतीय कंपन्यांनी नेपाळमध्ये औषधे निर्यात करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार नेपाळचे एक पथक औषध कंपन्यांच्या मानांकनाची तपासणी करण्यासाठी भारतात आले होते. काही कंपन्या मानांकनाच्या निर्देशांचे पालन करत नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळेच भारतीय औषध कंपन्यांना नेपाळमध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

रेडियंट पॅरेन्टेरल्स लिमिटेड, मरकरी लेबोरेटरीज लिमिटेड, एलायंस बायोटेक, कॅपटॅब बायोटेक, एग्लोमेड लिमिटेड, जी लेबोरेटरीज लिमिटेड, डॅफोडिल्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड, जीएलएस फार्मा लिमिटेड, यूनिजूल्स लाईफ साइंस लिमिटेड, कॉन्सेप्ट फार्मास्युटिकल्स प्राइवेट, आनंद लाइफ सायंसेस लिमिटेड, आईपीसीए लेबोरेटरीज लिमिटेड, कॅडिला हेल्थकेयर लिमिटेड, डायल फार्मास्युटिकल्स, एग्लोमेड लिमिटेड व मॅकुर लेबोरेटरीज लिमिटेड या कंपन्यांच्या औषधांवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

पश्चिम आफ्रिकन देशातील गॅम्बियामध्ये भारतीय औषध कंपनीने तयार केलेल्या सर्दी-खोकल्याचे सिरप प्यायल्याने ६६ बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. जागतिक आरोग्य संघटनेने या सिरपचा वापर न करण्याचा इशारा दिला. इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडने तयार केलेल्या ४ कफ सिरपबाबत अलर्ट जारी करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने कंपनी आणि नियामक प्राधिकरणांसोबत या प्रकरणाची चौकशी केली.

- Advertisement -

मेडेन फार्मास्युटिकल्सच्या चार खोकला आणि सर्दी सिरपची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. यामध्ये अति प्रमाणात डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचे प्रमाण आढळून आले. जे माणसांसाठी अत्यंत धोकादायक आहेत, असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने दिला. हे कफ सिरप हरियाणातील एका कंपनीत तयार केले जात आहे, अशीही माहिती समोर आली.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -