घरगणपती उत्सव बातम्याइंडोनेशियात बाप्पा करतोय ज्वालामुखीपासून गावकऱ्यांचे रक्षण!

इंडोनेशियात बाप्पा करतोय ज्वालामुखीपासून गावकऱ्यांचे रक्षण!

Subscribe

राज्यासह देशभरात गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र गणेशाची आराधना फक्त भारतातच नाही तर अनेक देशात देखील मनोभावे केली जाते. देशात अनेक ठिकाणी उत्खननात गणेश बाप्पांची मूर्ती आढळून येतात. इंडोनेशियामध्ये नोटांवर बाप्पांचे चित्र आहे तर विशेष म्हणजे याच देशात सक्रिय असणाऱ्या ज्वालामुखीच्या तोंडावर गेल्या ७०० वर्षांपासून हा बाप्पा विराजमान आहे.

इंडोनेशियामध्ये एकूण १४१ ज्वालामुखी आहेत, ज्यापैकी १३० अजूनही सक्रिय आहेत, म्हणजे यामध्ये सतत स्फोट होत असतात. यापैकी एक आहे माऊंट ब्रोमो डोंगरावरील ज्वालामुखी. जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असल्याने इंडोनेशियात जाणार्‍या पर्यटकांना येथील अनेक भागात जाण्यास बंदी आहे. परंतु, ज्वालामुखी धोकादायक असतानाही येथील लोक या डोंगरावरील प्राचीन गणेश मंदीरात जातात. त्यांना कुणीही रोखत नाही. त्यांची अशी श्रद्ध आहे की, गणेश पूजेमुळेच ते सुरक्षित आहेत.

- Advertisement -

माऊंट ब्रोमोचा अर्थ स्थानिक जावानीज भाषेत ब्रह्माशी संबंधित आहे. परंतु येथे मंदीर गणेशाचे आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, येथील मूर्ती ७०० वर्षांपासून आहे. जी त्यांच्या पूर्वजांनी स्थापन केली आहे. गणेश मूर्ती जळणार्‍या ज्वालामुखीच्या जवळ असूनही येथील लोकांचे रक्षण करते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच येतील पूर्व भागात वसलेला एक जातीसमुह, ज्यास Tenggerese नावाने आळखले जाते, तो श्री गणेशाची शेकडो वर्षांपासून पूजा करत आहे. हे गणेश मंदिर Pura Luhur Poten या नावाने ओळखले जाते. मंदिराची विशेषता म्हणजे येथे श्री गणेशाच्या विविध प्रकारच्या मूर्ती आहेत आणि सर्व मूर्ती ज्वालामुखीने तयार झालेल्या लाव्हाने बनल्या आहेत.

- Advertisement -

माऊंट ब्रोमोच्या जवळपासच्या ३० गावांमध्ये या जनजातीचे साधारण १ लाख लोक राहतात. ते स्वताला हिंदू मानतात. हिंदू रिती-रिवाज मानतात. काळाच्या ओघात यांच्या रिती-रिवाजात काही बुद्ध रिवाज सुद्धा जोडले गेले आहेत. जसे की हे लोक त्रिमूर्ती (ब्रह्मा, विष्णु, महेश) च्या पूजेसह भगवान बुद्धांची सुद्धा पूजा करतात.

सर्व रिती-रिवाजामध्ये एक विशेष पूजेचे Tenggerese मध्ये खुप महत्व आहे. ते प्रत्येक वर्षी १४ दिवसांसाठी माऊंट ब्रोमोच्या डोंगरावरील गणेश मंदिरात श्री गणेशाची पूजा करतात. या पूजेला ते Yadnya Kasada पर्व म्हणतात. १३ व्या ते १४ शतकाच्या दरम्यान या पूजेला सुरूवात झाली. या पाठीमागे एक लोककथा आहे, ज्यानुसार देवाने तेथील राजा-राणी, ज्यांना संतती नव्हती, त्यांना १४ मुले दिली, या शर्थीवर की, १५ व्या आणि शेवटच्या संततीला ते डोंगराला अर्पण करतील. यानंतर प्रत्येक वर्षी पूजा आणि पशुबळीची प्रथा सुरू झाली. अजूनही येथे बकर्‍यांचा बळी दिला जातो.

सोबतच येथे ज्वालामुखीच्या आत या बळीसह फळे-फुले आणि हंगामातील भाज्यासुद्धा अर्पण केल्या जातात. असे मानले जाते की, श्री गणेशाची पूजा आणि धगधगणार्‍या ज्वालामुखीला फळे अर्पण केल्यानेच त्यामध्ये स्फोट होत नाहीत. जर असे केले नाही तर येथील जनसमुदाय जळून नष्ट होईल, अशी त्यांची धारणा आहे.


जगातील सर्वात उंच बाप्पाची मूर्ती कोणत्या देशात आहे, तुम्हाला माहितीये का!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -