घरगणपती उत्सव बातम्यादक्षिण मुंबईत यंदा खड्ड्यातूनच जाणार गणेश विसर्जनाचा मार्ग?

दक्षिण मुंबईत यंदा खड्ड्यातूनच जाणार गणेश विसर्जनाचा मार्ग?

Subscribe

विघ्नहर्ता गणेशाचं आगमन झालं आणि भक्तांना बाप्पाला विघ्न दूर करण्याचं साकडं घातलं. पण मुंबईकरांचं खड्ड्यांचं विघ्न काही दूर होताना दिसत नाहीये. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही सालाबादप्रमाणे बाप्पांचं खड्ड्यांमधूनच जाऊन विसर्जन होणार का? असाच प्रश्न सर्व मुंबईकरांना आणि कदाचित खुद्द बाप्पांना देखील पडला असेल. किमान दक्षिण मुंबईतल्या चिरा बाजार परिसरात तरी हेच चित्र आहे. गिरगावमधल्या या परिरातला नाना शंकर शेठ मार्ग म्हणजे तर खडड्यांचं प्रदर्शनच! या रस्त्यावर वेगवेगळ्या आकाराचे, प्रकाराचे आणि लांबी-रुंदीचे खड्डे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर भरले जावे आणि बाप्पांचं विसर्जन विनासायास व्हावं, अशीच अपेक्षा स्थानिक करत आहेत.

नाना शंकर शेठ मार्गावर सध्या खड्डेच खड्डे पडलेले आहेत. सध्या गणेशोत्सव सुरू झाला आहे. त्यामुळे याच मार्गावरून गणेशामूर्ती विसर्जनस्थळी किंवा कृत्रिम तलावाकडे नेण्यात येत असतात. काळबादेवी येथील वेलकर स्ट्रीट, सोनापूर स्ट्रीट, चंदनवाडी, तुळशीवाडी,ताडवाडी, स. का. पाटील उद्याना समोरील मार्ग, झावबा वाडी, ठाकूरद्वार, क्रांतीनगर, फणस वाडी आदी ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले दिसत आहेत. याच मार्गावर मेट्रो रेल्वे प्रशासनाचे काम सुरू असल्याने पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधीच रस्त्यांवर खड्डे आणि त्यात फुटपाथ अपुरे असल्यामुळे रस्त्यांमधून वाहन आल्यास पादचाऱ्यांना इथून मार्ग काढणं कठीण जात आहे.

- Advertisement -

पूर्वी इथे मार्केट होते. पण मेट्रोच्या कामकाजामुळे ते इतरत्र हलविण्यात आले. त्यामुळे आता तो बाजार रस्त्यावरच भरतो. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता लवकरात लवकर पालिका प्रशासनाने या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी रमेश पंजारी यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -