घरदेश-विदेशNarendra Modi : मोदींची अमेरिकेतील मासिकाला मुलाखत; चीन आणि पाकिस्तानबाबत भूमिका स्पष्ट...

Narendra Modi : मोदींची अमेरिकेतील मासिकाला मुलाखत; चीन आणि पाकिस्तानबाबत भूमिका स्पष्ट केली

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि चीनमधील संबंधाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. भारत आणि चीनमधील स्थिर आणि शांततापूर्ण संबंध हे संपूर्ण क्षेत्र आणि जगासाठी महत्त्वाचे आहेत. राजनैतिक आणि लष्करी स्तरावर द्विपक्षीय संवादाद्वारे दोन्ही देश त्यांच्या सीमेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करू शकतील, अशी विश्वासही मोदींनी अमेरिकेतील मासिक न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून भारत आणि चीनमधील सीमा वाद, तसेच अरुणाचल प्रदेशातील वाद पुन्हा एकदा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. चीनसोबतचे सर्व प्रश्न चर्चेने सोडवण्याचा भारताचा प्रयत्न आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि चीनमधील संबंधाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. भारत आणि चीनमधील स्थिर आणि शांततापूर्ण संबंध हे संपूर्ण क्षेत्र आणि जगासाठी महत्त्वाचे आहेत. राजनैतिक आणि लष्करी स्तरावर द्विपक्षीय संवादाद्वारे दोन्ही देश त्यांच्या सीमेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करू शकतील, अशी विश्वासही मोदींनी अमेरिकेतील मासिक न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. (Interview of Narendra Modi to American magazine Explained the position regarding China and Pakistan)

न्यूजवीकला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी लोकसभा निवडणूक, पाकिस्तानसोबतचे संबंध, चीन सीमा वाद, राम मंदिर आणि लोकशाहीसह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, चीनसोबतचे संबंध भारतासाठी महत्त्वाचे आहेत. भारताच्या सीमेवर दीर्घकाळापासून सुरू असलेल्या परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. भारत आणि चीनमधील स्थिर व शांततापूर्ण संबंध केवळ दोन्ही देशांसाठीच नव्हे, तर संपूर्ण क्षेत्रासाठी आणि जगासाठी महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी म्हटले.

- Advertisement -

चीन आणि क्वाडबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि चीन हे अनेक गटांचे सदस्य आहेत. क्वाडचा उद्देश कोणत्याही देशाविरुद्ध नाही. SCO, BRICS आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांप्रमाणे, क्वाडदेखील समविचारी देशांचा समूह आहे, जो सकारात्मक अजेंड्यावर काम करतो. याचवेळी त्यांना पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत विचारले असता मोदी म्हणाले की, त्यांच्या नेत्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मी अभिनंदन केले आहे. तसेच दहशतवाद आणि हिंसाचारापासून मुक्त वातावरणासाठी शांतता, सुरक्षा आणि समृद्धीसाठी भारताने नेहमीच पाठिंबा दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

370 हटवण्याबाबत मोदी काय म्हणाले? (What did Modi say about the deletion of 370?)

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत होत असलेल्या टीकेवर मोदी म्हणाले की, मी तुम्हाला स्वतः तिथे जाण्यास सांगेन. कारण त्याठिकाणी होत असलेल्या सकारात्मक बदलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मी काय म्हणतो किंवा इतर कोणी काय म्हणतो त्यावर जाऊ नका. मी गेल्या महिन्यातच जम्मू-काश्मीरला गेलो होतो. पहिल्यांदाच तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात नवी आशा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले, असे मोदी म्हणाले.

- Advertisement -

मोदींनी सांगितले श्री रामाचे महत्त्व (Modi explained the importance of Shri Rama)

राम मंदिराबाबत बोलताना मोदी म्हणाले की, भारताच्या पवित्र भूमीच्या प्रत्येक कोपऱ्यात श्री रामाचे नाव प्रतिध्वनीत आहे. त्यामुळे 11 दिवसांच्या विशेष विधी दरम्यान, मी श्री रामाच्या पाऊलखुणा असलेल्या ठिकाणी तीर्थयात्रा केली. श्री राम मंदिराचा अभिषेक सोहळा हा देशासाठी एकतेचा ऐतिहासिक क्षण होता आणि शतकानुशतकांच्या चिकाटी व त्यागाचा कळस होता. जेव्हा मला या समारंभाचा भाग होण्यास सांगितले गेले, तेव्हा मला माहित होते की मी देशातील 1.4 अब्ज लोकांचे प्रतिनिधित्व करणार आहे, ज्यांनी राम लल्लाच्या पुनरागमनासाठी शतकानुशतके संयमाने वाट पाहिली आहे, असे मोदी म्हणाले.

सरकारच्या पाठिंब्यात सातत्याने वाढ (Steady increase in government support)

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आश्वासने पूर्ण करण्याचा त्यांच्या सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्यामुळे दुसऱ्या टर्मच्या शेवटी, सर्वात लोकप्रिय सरकार देखील सार्वजनिक समर्थन गमावतील. गेल्या काही वर्षांत जगातील सरकारांबद्दल असंतोषही वाढत आहेत, पण भारत याला अपवाद म्हणून उभा आहे, असेही मोदींनी म्हटले.

जागतिक वृत्तपत्रिकेद्वारे सन्मान मिळविणारे मोदी दुसरे पंतप्रधान (Modi is the second Prime Minister to be honored by a global newspaper)

दरम्यान, अलीकडच्या काळात एका अमेरिकेतील मासिकाला दिलेली पंतप्रधान मोदींची ही पहिलीच मुलाखत आहे. अमेरिका आणि जगासाठी मोदींचे महत्त्व सातत्याने वाढत आहे. मोदींची मुलाखत अमेरिकेतील मासिक न्यूजवीकने प्रकाशित करण्यासोबतच मासिकाने त्यांना आपल्या मुखपृष्ठावरही त्यांना स्थान दिले आहे. इंदिरा गांधींनंतर जागतिक वृत्तपत्रिकेद्वारे हा सन्मान मिळविणारे मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -