घरदेश-विदेशIsrael-Palestine conflict : इस्रायलने गाझा पट्टीला घातला वेढा; अन्न, पाणी, इंधन, गॅस...

Israel-Palestine conflict : इस्रायलने गाझा पट्टीला घातला वेढा; अन्न, पाणी, इंधन, गॅस अन् वीजपुरवठा खंडित

Subscribe

नवी दिल्ली : हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर 20 मिनिटांत सुमारे 5 हजार रॉकेट डागले होते. त्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन (Israel-Palestine conflict) मध्ये सुरु झालेल्या संघर्षात दोन्ही बाजूकडील 1400 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर, 2100 हून अधिक नागरिक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. (Israel Palestine conflict Israel lays siege to the Gaza Strip Food water fuel gas and electricity supply interrupted)

हमासने रॉकेट हल्ल्यानंतर जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने हमासचे सैनिक इस्रायलमध्ये घुसले आहेत. त्यांनी अनेक शहरे आणि लष्करी तळांवर घुसखोरी केली आहे. त्यांच्या सैनिकांनी इस्रायली नागरिक, सैनिक आणि परदेशी नागरिकांचे अपहरण करून त्यांना ओलीस बनवून बोगद्यात ठेवले आहे. त्यानंतर इस्रायलच्या हवाई दलानेही हमास गटाच्या ताब्यात असलेल्या गाझा सीमेवर जलद हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – युद्ध इस्रायलचे, चटके भारताला: कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, पेट्रोल-डिझेलचा भडका उडणार?

इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी संपूर्ण गाझा पट्टीला वेढा घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना गाझा पट्टीचा वीज, अन्न आणि पाणी यासह अत्यावश्यक पुरवठा खंडित करण्यास सांगितले आहे. इस्रायलने 48 तासांत गाझा सीमेवर 3 लाख सैनिक तैनात केले आहेत. Yoav Gallant ने 2.3 दशलक्ष लोक राहत असलेल्या एन्क्लेव्हचा संदर्भ देत एका व्हिडिओ संदेशात ही घोषणा केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ब्रिटीशांचं एक ‘पत्र’, हिटलरच्या नाझी सैन्याचा नरसंहार…; अन् असा बनला इस्रायल ज्यूंसाठी वेगळा देश

हमासने ऐतिहासिक चूक केली 

दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, ‘इस्रायलमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. आम्हाला युद्ध नको आहे, पण ते आमच्यावर लादले गेले आहे. हे युद्ध आम्ही सुरू केले नाही तर ते आम्ही संपवू. एक काळ असा होता की, ज्यू लोक राज्यहीन आणि निराधार होते पण आता नाही. इस्रायलवर हल्ला करून हमासने ऐतिहासिक चूक केली आहे हे आता त्यांना समजेल. इस्त्रायलच्या इतर शत्रूंना येणार्‍या काळासाठी लक्षात राहतील अशी किंमत आम्ही निश्चित करू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -