घरदेश-विदेशISROचे नवे सॅटेलाईट लाँच, भारतीयांना होणार 'हे' फायदे

ISROचे नवे सॅटेलाईट लाँच, भारतीयांना होणार ‘हे’ फायदे

Subscribe

या नव्या सॅटेलाईटमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. टेलिकम्युनिकेश सर्व्हिसमध्ये या सॅटेलाईटमुळे मोठे बदल पहायला मिळणार आहे. 

भारतीय अनुसंधान संगठन पुन्हा एकदा इतिहास रचणार आहे. ISROआज पीएसएलव्ही- सी ५०द्वारे संचार उपग्रह सीएमएस-०१ लाँच करणार आहे. कोरोनाच्या काळातील ISROचे हे दुसरे मिशन आहे. त्यासाठी सतीश धवन स्पेस सेंटरवरून २५ तासांचे उलटे काऊडाउन सुरू केले होते. या नव्या सॅटेलाईटमुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. टेलिकम्युनिकेश सर्व्हिसमध्ये या सॅटेलाईटमुळे मोठे बदल पहायला मिळणार आहे.


पीएसएलव्ही हे ISROचे ५२वे मिशन आहे. संचार उपग्रह-०१ हे दुपारी ३.४१ वाजता श्रीहरीकोटमधून प्रेक्षपित केले गेले. सीएमएस-०१ हे ISROचे ४२वे सॅटेलाईट आहे. या देशाच्या मुख्य भूमीसोबतच अंदमान निकोबार आणि लक्षद्विप समूहला एक्सटेंडेड सी बेड ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे. या आधी ७ नोव्हेंबरला पीएसएलव्ही -सी४९चे भू- निगरानी सॅटेलाईट प्रेक्षपित केले होते. आता प्रेक्षपित केलेले सीएमएस-०१ हे सॅटेलाईट भारतात नवा इतिहास घडवून आणणार आहे असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

सीएमएस-०१ सॅटेलाईटमुळे टेलिकम्युनिकेशन सेवेमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. सीएमएस-०१ च्या मदतीने टिव्हि चॅनेलची पिक्चर क्वॉलिटी सुधारण्यासाठी मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर सरकारला आपतकालीन परिस्थितीमध्ये मोठी मदत होणार आहे. या आधी २०११ मध्ये प्रेक्षपित केलेल्या जीसेट-२ टेलिकम्युनिकेशन सॅटेलाईटची जागा सीएमएस-०१ सॅटेलाईट घेणार आहे. आता सीएमएस-०१ सॅटेलाईट हे पुढची सात वर्षे सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळे आता टिव्हि चॅनेल क्वॉलिटी सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. या नव्या सॅटेलाईटचा भारताला नक्कीच मोठा फायदा होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रजासत्ताक दिनी नव्या बाबरी मशीदीची पायाभरणी, शनिवारी ब्लू प्रिंटचे अनावरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -