घरताज्या घडामोडीLive Updates: करण जोहर एनसीबीच्या जाळ्यात

Live Updates: करण जोहर एनसीबीच्या जाळ्यात

Subscribe

करण जोहर एनसीबीच्या जाळ्यात

निर्माता,दिग्दर्शक करण जोहर एनसीबीच्या जाळ्यात. बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात त्याला एनसीबीकडून समन्स बजावण्यात आला आहे.

- Advertisement -

 

देशात कोरोनाबाधितांची संख्या ९९ लाख ५६ हजार ५५८ वर पोहोचली असून गेल्या २४ तासात २४ हजारांहून अधिक नवे कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३५५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिलासादायक म्हणजे ९४ लाख ८९ हजार ७४० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -


आजपासून मध्य रेल्वेवर एसी लोकल सुरु करण्यात आली आहे. सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर ही लोकल धावणार आहे. या एसी लोकलच्या दिवसाला दहा फेऱ्या प्रायोगिक तत्त्वावर चालवल्या जाणार असल्याची माहिती मिळतेय. प्रवाशांचा प्रतिसाद बघून येणाऱ्या काळात या फेऱ्या वाढवल्या जातील. सामान्य नागरिकांना या लोकलमध्ये प्रवासाची मुभा मिळेल तेव्हा या लोकलला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. (सविस्तर वाचा)


केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन नव्या कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयकांची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमातील त्रुटी आणि उणिवा यांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी गठित केलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची आज दुपारी २ वाजता बैठक होणार आहे.


कल्याण ग्रामीणमधील आडीवली परिसरातील बनावटी डिझेल तयार करणाऱ्या गोदामावर पोलिसांनी छापा मारला आहे. कल्याण क्राइम ब्रान्चने ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ११ हजार लीटर बनावटी डिझेल जप्त करण्यात आले आहे. तर ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -