घरट्रेंडिंगना सोनं ना होंडा! लग्नात घ्या २१ सापांचा हुंडा; भारतातली अजब प्रथा!

ना सोनं ना होंडा! लग्नात घ्या २१ सापांचा हुंडा; भारतातली अजब प्रथा!

Subscribe

जाणून घ्या, का दिले जातात लग्नात जावायाला २१ सापांचा हुंडा

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून सगळीकडे कोरोनाचे नियम पाळून विवाह पार पडत आहे. आपल्या देशात हुंडा देण्यावर आणि स्वीकारण्याला कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. हुंड्यापायी जाणारे बळी थांबवण्यासाठी हा कठोर कायदा देशात लागू करण्यात आला आहे. पण, तरीही काही ठिकाणी लपून छपून हुंडा दिला जातो आणि स्वीकारलाही जातो. आतापर्यंत आपण लग्नाला सोनं, चांदी, महागड्या गाड्यांसह संसारातील उपयोगी वस्तू हूंडा म्हणून देताना पाहिले आहे. मात्र देशात असं एक ठिकाण आहे. ज्याठिकाणी हुंडा म्हणून एक नाही दोन नाही तब्बल २१ साप देण्याची प्रथा आहे.

या ठिकाणी जोपासली जाते प्रथा

मध्य प्रदेशात राहणाऱ्या गौरिया नावाची जमात आहे, या जमातीत ही भयंकर प्रथा आहे. या जमातीतील लोक आपल्या मुलींना लग्नात हुंडा म्हणून तब्बल २१ साप भेट देण्याची प्रथा आहे. हे सगळे साप विषारी असतात. या जमातील लोकांची अशी धारणा आहे की, हे २१ साप लग्नात हुंडा म्हणून दिले नाहीतर काही तरी अपशकून किंवा वाईट प्रसंग लग्नात घडतो. म्हणून या ठिकाणी लग्नात हुंडा म्हणून २१ साप दिले जातात. अशा प्रकारचा हुंडा लग्नात दिल्यानंतर कोणतेही विघ्न येत नाही.

- Advertisement -

दरम्यान, २१ सापांचा हुंडा दिल्याने नवदांपत्याचं वैवाहिक जीवन सुखी राहतं, असा देखील समज आहे. मध्यप्रदेशात गेले कित्येकं शतकं ही प्रथा सुरू आहे. या भागात वऱ्हाडी देखील लग्नात भेट, आहेर म्हणून नागासारखे विषारी साप आणतात आणि नव्या जोडप्याला शुभेच्छा देतात. अशीही महिती मिळतेय की, लग्नात नवऱ्या मुलाला भेट देण्यासाठी सगळे साप वधुपिता स्वतःकडून आणतो. यासह मुलीचं लग्न ठरल्यानंतर मुलीचा पिता साप पकडण्यास सुरूवात करतो. जर लग्नापर्यंत पित्याने २१ विषारी साप पकडले नाही किंवा त्याला ते शक्य नसेल तर ते लग्न रद्द केले जाते. त्यामुळे वधुपिता कमी वेळात सापाचा शोध सुरू करतो.

गौरिया जमातीबद्दल…

मध्य प्रदेशातील ही जमात गारूड्यांचं काम करते. त्यामुळे लग्नात ते सापच भेट, हुंडा म्हणून देतात. असेही सांगण्यात येते की, या समाजातील लोकांचे उपजीविकेचं हेच साधन असल्याने सापांचे खेळ दाखवून पैसे कमावले जातात आणि विष विकून त्यांना पैसै मिळतात. त्यामुळे लग्नात विधिवत जावायला साप देण्याची प्रथा या ठिकाणी आहे.


Viral Video : मोदी म्हणतात मास्क नको
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -