घरताज्या घडामोडीJammu and Kashmir: श्रीनगरमध्ये CRPF जवानांवर दहशतवाद्यांनी फेकले ग्रेनेड, पोलीस कर्मचारीसह दोन...

Jammu and Kashmir: श्रीनगरमध्ये CRPF जवानांवर दहशतवाद्यांनी फेकले ग्रेनेड, पोलीस कर्मचारीसह दोन जखमी

Subscribe

जम्मू आणि काश्मीर येथील श्रीनगर येथील ईदगाह भागात आज, बुधवारी अली मशिदीजवळ दहशतावाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोन जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 161 BNवर ग्रेनेड हल्ला केला.

दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्याच्या परिसरामधील रहिवासी एजाज अहमद भट जखमी झाले आहेत. ४१ वर्षांचे एजाज गुलाब नबी भट यांचा मुलगा आहे. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव सजाद अहमद भट असून ईदगाहच्या नरवरा परिसरात राहणारा आहे. दोघांनाही एसएचएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, घटनेत जखमी झालेल्या नागरिकाच्या चेहऱ्याचा डाव्या बाजूला आणि डाव्या हाताला दुखापत झाली आहे. तर पोलीस कर्मचारीच्या उजव्या बाजूला जखम जाली आहे. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

सामान्य नागरिक आणि सुरक्षा रक्षकांवर होणाऱ्या दहशतवाद्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने ५,५०० हून अधिक अतिरिक्त केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे जवान घाटीत पाठवले आहेत. केंद्रीय दलाच्या जवानांमध्ये सीआरपीएफ आणि बीसीएफ जवानांचा समावेश आहे. यांचा वापर एलओसी आणि जवळच्या भागात सुरक्षा वाढवण्यासाठी केला जाईल. वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हत्येनंतर सुरक्षा आणि जमिनीवर सैन्याची दृश्यमानता वाढवण्याच्या धोरणाचा भाग म्हणून आणखी कंपन्या घाटीत हलवण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणातील मोठी बातमी : आशिष मिश्राच्या रायफलमधून सुटली गोळी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -