घरदेश-विदेशबारामुल्लामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; दोन दहशतवादी ठार

बारामुल्लामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; दोन दहशतवादी ठार

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये ५ दहशतवाद्यांना आज दिवसभरामध्ये ठार करण्यात यश आले. बारामुल्ला जिल्ह्यातील बोनिआर परिसरात लपलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यानंतर नकाबंदी दरम्यान दोन जणांना ठार करण्यात जवानांना यश आले.

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. आज उत्तर काश्मीरच्या बारामुल्लामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकी दरम्यान दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. तर एक जवान शहीद तर ४ ते ५ जवान जखमी झाले आहेत. जवानांनी घटनास्थळावरुन एके ४७ रायफल, चीन निर्मित दोन पिस्तुल आणि इतर शस्त्रसाठा जप्त केला. याआधी आज सकाळी तीन दहशतवाद्यांना एलओसीवर ठार करण्यात पोलिसांना यश आले. त्यानुसार आज दिवसभरामध्ये पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले.

- Advertisement -

नाकाबंदी दरम्यान पोलिसांवर गोळीबार

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, हा दहशतवादी हल्ल नव्हता. पोलीस नाकाबंदी करुन सर्च ऑपरेशन करत होते. दरम्यान दोन संशयित स्कॉर्पिओ कारने येत होते. त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न करुन लायसन्स मागितले. मात्र त्यांनी पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार करुन त्याला ठार केल. तर दुसऱ्याने पळण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्यावर देखील पोलिसांनी गोळीबार करत त्याला ठार केले.

- Advertisement -

तीन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सकाळी जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. एलओसीजवळ या दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. त्यांच्याजवळून जवानांनी एके-४७ आणि मोठा शस्त्रसाठा जप्त केला. जवानांना बारामुल्लाच्या बोनियारमध्ये दहशतवादी घुसखोरी करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले असता दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले.

संबंधित बातम्या – 

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; ३ दहशतवादी ठार, ४ एके ४७ जप्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -