घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये चकमक; ३ दहशतवादी ठार, ४ एके ४७ जप्त

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; ३ दहशतवादी ठार, ४ एके ४७ जप्त

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील बोनिआर परिसरात लपलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांच्याकडील ४ एके ४७ जप्त करण्यात आले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तांकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील बोनिआर परिसरात लपलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांच्याकडील ४ एके ४७ जप्त करण्यात आले असून या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांचा अजूनही शोध सुरु असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

तीन दहशवाद्यांनचा खात्मा

बोनिआर परिसरात एलओसी जवळ दहशतवादी लपलेल्याची माहिती सुरक्षा दलांना गुरुवारी सायंकाळी मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी लष्कराने हा परिसर घेरुन धरला. यादरम्यान एलओसी जवळ लपलेल्या तीन दहशवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. काश्मीरमध्ये आतापर्यंत २५० तळांवर एकूण ३०० दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी भारतीय सैनिकांनी मोहीम छेडली असून सीमेपलीकडून दहशतवादी भारतात येणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; २ दहशतवादी ठार, एक जवान शहीद

वाचा – ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १७ वर्ष पूर्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -