घरदेश-विदेशजम्मू-काश्मीर : त्रालमध्ये चकमक; दहशतवाद्यांना घेरण्यात जवानांना यश

जम्मू-काश्मीर : त्रालमध्ये चकमक; दहशतवाद्यांना घेरण्यात जवानांना यश

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात आज झालेल्या चकमकीत दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरण्यात जवानांना यश आले आहे.

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच असून शोपियानमधील चकमकीला काही तास उलटच नाहीत तोच, पुलवामातील त्राल परिसरात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलांच्या जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

- Advertisement -

त्रालमध्ये आज चकमक

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना जवांनी घेरल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गोळीबार थांबला असून सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी शोपियानमधील चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेचे दोन दहशतवादी मारले गेले. राहिल राशिद शेख आणि बिलाल अहमद अशी त्या दोन्ही दहशतवाद्यांची नावे होती. त्यातील राहिल हा तीनच दिवसांपूर्वी संघटनेत सामील झाला होता. तो गांदरबल जिल्ह्यातील रहिवासी असून त्याचे एमटेकपर्यंत शिक्षण झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -