घरलाईफस्टाईलजागतिक आरोग्य दिन : उत्तम आरोग्यासाठी हे नक्की करून बघा!

जागतिक आरोग्य दिन : उत्तम आरोग्यासाठी हे नक्की करून बघा!

Subscribe

रोजच्या रोज आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.

आज, जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपल्या आहारात नेमकं काय असावं आणि आपण काय टाळावं याबाबत माहिती घेणार आहोत. रोजच्या रोज आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. शिवाय काही गोष्टींची नियमित काळजी घेणेही गरजेचे आहे. त्यामुळे खाली दिलेल्या टिप्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात.

हे करा

  • अधिक पाणी प्या
    आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाणी हे आपल्या शरीराचे प्रमुख तत्व असून वजनाच्या ६० टक्के अंश पाणी असते. शरीराच्या प्रत्येक अवयवाला पाणी आवश्यक असते. दिवसभरात किमान १.५ लीटर पाणी आपल्या शरीराला आवश्यक असते.
  • हिरव्या पालेभाज्या खा
    आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. यामध्ये मेथी, पालक, कांद्याची पात, चुका-चाकवत, लाल माठ, हिरवा माठ, चवळी इ. पालेभाज्यांचा समावेश करावा. पालेभाज्या खाल्याने डोळे चांगले राहतात. शिवाय पचनक्रीया, रक्तशुद्धीकरण सर्वांवरच त्यांचा चांगला परिणाम दिसून येतो.
  • भरपूर फळं खा
    दररोज फळांचे सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे तुम्ही कमी आजारी पडता. रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला डॉक्टरची गरज भासणार नाही, असे आपण नेहमी ऐकतो. परंतू प्रत्येकाला परवडेल अशी फळं खाल्ली तरी तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. त्या त्या सिजननुसार फळांचे सेवन करावे. त्यातही केळी ही स्वस्त आणि आरोग्याला मस्त असतात.
  • व्यायाम करा
    व्यायाम केल्याने शरीरात स्फूर्ती जागृत होते. हृदयासोबत शरीरातील मांसपेशी मजबूत होत असतात. व्यायाम सवय लावल्याने शरीर विकसित होत असते. पोहणे किंवा सायकल चालवणे आदी गोष्टी व्यायाम म्हणून आपण करू शकता.

हे टाळा

  • आहारातील मीठ कमी करा
    लोणचे, पापड, चटणी, दही, केन्ड सूप यांचे कमी प्रमाणात सेवन करा. कारण त्यात इतर पदार्थांच्या तुलनेत अधिक मीठ असते. रोजच्या आहारातही मीठ कमीच असावे. मीठाचे अतिसेवनामुळे शरीराची हाडे ठिसूळ होतात. दिवसभरात ५ ग्रॅमपेक्षा अधिक मीठ आपल्या शरीरावर विपरीत परीणाम करते.
  • वजन कमी करा
    अतिरिक्त वाढलेले वजन धोकादायक ठरू शकते. यातूनच हृदयरोग व मधुमेह यासारखे आजार होण्याची शक्यता असते. लठ्‍ठपणा टाळण्यासाठी आधीपासून संतुलित आहाराचे सेवन केले पाहिजे. दिवसभरातून एकदा आपले वजन करून पहावे. वजन वाढल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर डॉक्टराचा सल्ला घ्यावा.
  • रक्तदाब व कोलेस्ट्रॉलची तपासणी
    उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीला मुतखडा व हृदयविकाराचा झटका येण्याची भीती अधिक असते. त्यामुळे नियमितपणे रक्तदाबाची तपासणी केली पाहिजे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -