घरमुंबईतडीपार पिस्तूल तस्कर मनीष नागोरीला कोल्हापूरात अटक

तडीपार पिस्तूल तस्कर मनीष नागोरीला कोल्हापूरात अटक

Subscribe

दाभोळकर हत्येप्रकरणी पिस्तूल पुरवल्याचा आरोप मनिष नागोरीवर आहे.

आंतरराज्य पिस्तूल तस्कर म्हणून ओळख असलेल्या मनीष नागोरीला कुल्हापुरातून अटक करण्यात आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार सापळारचत हॉटेल स्कायलार्क येथुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शाहापूरी पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली असून, रविवारी दुपारी त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये बेकायदेशीरपणे पिस्तुल पुरवण्याचे काम मनीष नागोरी करत होता. मनीष रामविलास पासवान, असे त्याचे पूर्ण नाव असून मन्या उर्फ राजू भाई म्हणून त्याची गुन्हेगारी विश्वात ओळख आहे.

पॅरोलवर सुटका

दरम्यान, पॅरोलवर काही दिवसांसाठी त्याची सुटका करण्यात आली होती. मात्र संधी साधून तो फरार झाला होता. (३७) वर्षीय मनीष नागोरीवर कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये या पूर्वी शस्त्र तस्करी प्रकरणी अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात त्याचा हात असल्याचे बोले जात असून, कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी देखील यापूर्वी त्याची चौकशी करण्यात आली आहे.

- Advertisement -

दाभोळकर हत्येप्रकरणी चौकशी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दभोळकर हत्याप्रकरणात वापरण्यात आलेले पिस्तूल हे मनीष नागोरीने पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला पोलिसांनी अटक केली होती. दाभोळकर हत्येसह मनीष नागोरीवर २८ गुन्ह्यांची नोंद आहे. दोन वर्षांपूर्वी साताऱ्यात खंडणीच्या प्रकरणात गोळीबार, बनावट पिस्तुल प्रकरणी शिवजीनगर पोलिसांनी तसेच, कोल्हापूरात मनीष त्यागी हत्या प्रकरण अशे खुनाचे जवळपास २० गुन्हे मनीष नागोरीवर दाखल आहेत. रिटेल मोबाईल विक्रीचा व्यवसाय ते परराज्यतन चोरुन पिस्तुल आणून त्या विकणे असा मनिष नागोरी याचा प्रवास आहे. यानंतर सुपाऱ्या, खंडणी, मर्डर यांसारख्या अनेक गोष्टींमुळे गुन्हेगारी विश्वात तो प्रसिद्ध आहे. मात्र कोणताही ठोस पुरवा, धागे दोरे हातत लागत नसल्याने तो नेहमी जामीनावर सुटतो.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -