घरदेश-विदेशपुलवामामध्ये दहशतवाद्यांचं पुन्हा एकदा नापाक कारस्थान, पोलीस चौकीवर ग्रेनेड फेकला, दोन पोलीस...

पुलवामामध्ये दहशतवाद्यांचं पुन्हा एकदा नापाक कारस्थान, पोलीस चौकीवर ग्रेनेड फेकला, दोन पोलीस जखमी

Subscribe

मात्र, सुदैवाने या हल्ल्यात सुरक्षा दलाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, पुलवामा येथील पोलीस चौकीजवळ सीआरपीएफ आणि पोलिसांचे संयुक्त पथक तैनात होते. यादरम्यान घुसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेडने हल्ला केला.

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा त्यांचं नापाक कारस्थान केलंय. पुलवामा येथील पोस्ट ऑफिसजवळील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांना या घृणास्पद कटाचे लक्ष्य बनवण्यासाठी ही संपूर्ण घटना घडवली होती.

मात्र, सुदैवाने या हल्ल्यात सुरक्षा दलाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, पुलवामा येथील पोलीस चौकीजवळ सीआरपीएफ आणि पोलिसांचे संयुक्त पथक तैनात होते. यादरम्यान घुसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेडने हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरात कडक बंदोबस्त वाढवला.

- Advertisement -

तीन वेगवेगळ्या चकमकीत 5 दहशतवादी ठार

त्याच वेळी शनिवारी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये तीन वेगवेगळ्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या पाच दहशतवाद्यांपैकी एक आयईडी तज्ज्ञ होता. अशी माहिती पोलिसांनी दिली. शोपियान जिल्ह्यात लष्कर-ए-तय्यबाचे दोन दहशतवादी ठार झाले. तर दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात अन्सार गझवत-उल-हिंदचे दोन दहशतवादी ठार झाले. याशिवाय अनंतनागच्या श्रीगुफ्वारा भागातील कलानमध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शोपियानच्या चौगाम गावात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांची उपस्थिती आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची पूर्ण संधी देण्यात आली. मात्र दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करण्यास नकार देत संयुक्त शोध पथकावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि चकमकीत दहशतवादी मारले गेले.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -