घरक्राइमरिचार्जसाठी चारशे रुपये न दिल्याने मित्रावर चाकूहल्ला

रिचार्जसाठी चारशे रुपये न दिल्याने मित्रावर चाकूहल्ला

Subscribe

मोबाईल रिचार्जसाठी चारशे रुपये न दिल्याने एका तरुणाने मित्रावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना विश्वकर्मा मंदिरासमोर, गंगासागर, श्रमिकनगर, सातपूर येथे घडली. याप्रकरणी ऋतिक देवराम इंगळे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित उमेश चिंतामण गवारे (रा.श्रमिक नगर, सातपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ऋतिक इंगळे व उमेश गवारे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. उमेशने ऋतिककडे मोबाईल रिचार्जसाठी चारशे रुपये मागितले. त्यावेळी ऋतिकने माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले. राग अनावर झाल्याने उमेशने ऋतिकला शिवीगाळ करत चाकूहल्ला केला. त्यात ऋतिक गंभीर जखमी झाला. पोलीस हवालदार भड करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -