घरताज्या घडामोडीदर ३ वर्षांनी घटस्फोट घेतल्यानंतर हे जोडपं एकमेकांशी पुन्हा करतात लग्न, कारण...

दर ३ वर्षांनी घटस्फोट घेतल्यानंतर हे जोडपं एकमेकांशी पुन्हा करतात लग्न, कारण ऐकून बसेल धक्का

Subscribe

लग्न करणे हे काही पोरखेळ नाहीये, ही गोष्टी किंवा हे वक्तव्य आपण ऐकलंच असेल. कारण लग्न झाल्यानंतर अनेक जबाबदाऱ्या वाढतात. मात्र, जपानच्या एका जोडप्याने चक्क कमालच केली आहे. हे जपानी जोडपे दर ३ वर्षांनी घटस्फोट घेतात आणि पुन्हा ऐकमेकांशी लग्न करतात. त्यांचे कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

ऑडिटी सेंट्रल वेबसाइटच्या अहवालानुसार, टोकियोपासून एक हाचियोजी नावाचे शहर आहे. येथे एक तरुण जोडपे राहतात. ज्यांनी त्यांच्या आडनावाबद्दल खूप विचित्र वृत्ती स्वीकारली आहे. वास्तविक, या जोडप्याने काही महिन्यांपर्यंत एकमेकांना डेट केले होते आणि नंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नाआधी दोघांचेही आडनावावरून भांडण झाले.

- Advertisement -

पतीने सांगितले की, लग्नानंतर पत्नी पतीचे कौटुंबिक आडनाव बदलते. परंतु त्याची पत्नी आपले आडनाव बदलण्यास तयार नव्हती. दोघांनीही याबाबत त्यांच्या मित्रांशी चर्चा केली, पण त्यांना कोणताही तोडगा सापडला नाही. मग या जोडप्याला आणखी एका जोडप्याबद्दल कळले ज्यांना अशीच समस्या होती आणि त्यांनी स्वीकारलेली पद्धत या जोडप्याने स्वीकारली. दोघांनीही दोघांचे आडनाव लावायचे ठरवले, पण काही काळानंतर त्यांनी दर तीन वर्षांनी एकमेकांना घटस्फोट देऊन पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोट देऊन हे जोडपं तिसऱ्यांदा लग्न करणार

२०१६ मध्ये या दोघांनी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर दोघांनीही पतीचे आडनाव आपल्या नावाच्या शेवटी लावण्याचे ठरवले. मात्र, २०१९ मध्ये या दोघांनीही ऐकमेकांना घटस्फोट दिला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी ऐकमेकांशी लग्न करायचं ठरवलं. यावेळी दोन्ही जोडप्याने पतीचे आडनाव पत्नीच्या शेवटी लावण्यास तयार झाले. परंतु एक धक्कादायक गोष्ट म्हणजे या वर्षातील जुलैमध्ये त्यांचा पुन्हा एकदा घटस्फोट होणार आहे. त्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर हे जोडपे ऐकमेकांशी लग्न करणार आहेत.

- Advertisement -

या जोडप्याकडे अजून एक उपाय होता. यामध्ये कोणत्यातरी दुसऱ्या देशात जाऊन लग्न करण्याचा उपाय होता. जिथे आपापले आडनाव नावाच्या शेवटी ठेवण्यास मुभा असते, असं या जपानच्या जोडप्याने म्हटलं आहे. परंतु जपानच्या कायद्यानुसार लग्नानंतर पती-पत्नीने समान शांतता ठेवणे बंधनकारक आहे.


हेही वाचा : Pakistan Army Chief On Kashmir : काश्मीरचा मुद्दा सोडवण्यासाठी भारतानं पुढाकार घेतल्यास आम्हीही तयार : जनरल बाजवा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -