घरदेश-विदेशJapan Earthquake : 90 मिनिटांत भूकंपाचे 21 धक्के; त्सुनामीच्या इशाऱ्याने जपानी नागरिक...

Japan Earthquake : 90 मिनिटांत भूकंपाचे 21 धक्के; त्सुनामीच्या इशाऱ्याने जपानी नागरिक भयभीत

Subscribe

जपानमध्ये 4.0 तीव्रतेचे एकापाठोपाठ एक असे 21 भूकंपाचे धक्के जाणवले. यातील एका भूकंपाची रिश्टर स्केलवरील तीव्रता 7.6 एवढी होती. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे.

टोकीओ : भूकंपाचा देश म्हणून ओळख असलेल्या जपानी नागरिकांची नवीन वर्षाची सुरुवात भूकंपानेच झाली. आज सोमवारी (1 जानेवारी) जपानमध्ये 90 मिनिटांत भूकंपाचे तब्बल 21 धक्के बसले. एवढेच नाही तर भूकंपानंतर पुन्हा एकदा त्सुनामीचाही इशारा देण्यात आला असून, यामुळे नागरिक भयभयीत झाले आहेत. (Japan Earthquake 21 earthquakes in 90 minutes Tsunami warning scares Japanese citizens)

जपानमध्ये 4.0 तीव्रतेचे एकापाठोपाठ एक असे 21 भूकंपाचे धक्के जाणवले. यातील एका भूकंपाची रिश्टर स्केलवरील तीव्रता 7.6 एवढी होती. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे. तेव्हा जपानमध्ये पुन्हा एकदा त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून, यामुळे जपानी नागरिक भयभयीत झाले आहे. त्सुनामीच्या शक्यतेमुळे प्रशासनही अलर्ट मोडवर आलं आहे.

- Advertisement -

वीजपुरवठा खंडीत, महामार्ग ओस

जपानमध्ये झालेल्या आजच्या भूकंपामुळे स्थानिक प्रशासनाने अलर्ट मोडवर येत तत्काळ 34 हजार घरातील वीजपुरठवठा खंडीत केला आहे. यामुळे काही भागात काळोख पसरला आहे. यासोबतच देशातील अनेक प्रमुख महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहेत. काही ठिकाणी भूकंपामुळे रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. अनेक घरांना तडेही गेले आहेत. तर भूकंपात आतापर्यंत पाच नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

 

- Advertisement -

भारतीय दूतावास अलर्टमोडवर

जपानमध्ये झालेल्या भूकंपानंतर भारतीय दूतावासही अलर्ट मोडवर आलं आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांच्या सोयीसाठी एमर्जन्सी कंट्रोल रुम स्थापन केला आहे. कोणत्याही मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा : Nana Patole : जुलमी कायदा मंजूर करण्यासाठीच खासदारांचे निलंबन; नाना पटोलेंची सरकारवर टीका

13 वर्षांनंतर जपानमध्ये त्सुनामी

जपान देशात दरदिवशी कुठे ना कुठे भूकंप होतच असतो. अशातच 13 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 मध्ये जपानमध्ये त्सुनामी आली होती. त्सुनामीमुळे अनेकांचे बळी जाऊन प्रचंड नुकसानही झालं होतं. आता पुन्हा 13 वर्षांनंतर जपानमध्ये त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे. समुद्रात पाच मीटरपर्यंत उंचच्या उंच लाटा उसळताना दिसत आहेत.

हेही वाचा : Sanjay Raut यांच्या ‘त्या’ पत्राला गृह विभागाने दिले सविस्तर उत्तर, वाचा…

विमानतळावर नागरिकांची धावपळ

भूकंपानंतर जपानमधील समुद्राने आक्राळविक्राळ रुप धारण केलं आहे. जीव वाचविण्यासाठी नागरिक विमानतळाकडे धाव घेत असून, यामुळे विमानतळावर गर्दी वाढली आहे. लोक जीव वाचविण्यासाठी इकडे तिकडे सैरावैरा धावताना दिसत आहे. काही एअरपोर्ट कर्मचारी जीव वाचविण्यासाठी टेबलच्या खाली लपून बसत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -