घरक्राइमगँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात Goldie Brar दहशतवादी घोषित; Sidhu Moosewalaच्या हत्येशी...

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात Goldie Brar दहशतवादी घोषित; Sidhu Moosewalaच्या हत्येशी संबंध

Subscribe

नवी दिल्ली : कॅनडामध्ये राहून भारतात गुन्हेगारी कारवाया घडवणाऱ्या गँगस्टर गोल्डी ब्रारवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारने गोल्डी ब्रारला बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. गोल्डी ब्रार कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात असल्याचे बोलले जाते. तसेच तो पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मानला जातो. त्यांच्या सांगण्यावरूनच बिष्णोई टोळीच्या हल्लेखोरांनी सिद्धू मुसेवालाची हत्या केल्याचे बोलले जाते. (Gangster Lawrence Bishnoi Right Hand Goldie Brar Declared Terrorist Link to Sidhu Moosewala murder)

हेही वाचा – IIT BHU : अटकेच्या भीतीने मध्य प्रदेशात प्रचाराला गेलो; बलात्कार प्रकरणातील आरोपींनी सांगितला घटनाक्रम

- Advertisement -

केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने परदेशातून चालणाऱ्या टोळ्यांची दीर्घ तपासानंतर यादी तयार केली आहे. यामध्ये देशाच्या सुरक्षेला धोका असलेल्या सुमारे 28 मोठ्या कुख्यात गुंडांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ही यादी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सोपवण्यात आली आहे. हे गुंड पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थानसह अनेक राज्यांत मोठमोठे गुन्हे घडवत आहेत. एवढेच नाही तर ते देशविरोधी कारवायांमध्येही सहभागी आहेत.

गँगस्टर गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदर सिंग उर्फ ​​सतींदर सिंगजीत सिंग आहे. 2021 मध्ये तो भारतातून कॅनडाला पळून गेला. त्यानंतर तो कॅनडा आणि अमेरिकेत गुन्हेगारी व दहशतवादी कारवाया घडवत आहे. एका मॉड्यूलच्या माध्यमातून तो पंजाबसह अनेक राज्यात गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्याच्या विरोधात गृह मंत्रालयाकडून अधिसूचना काढण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टर म्हणून दहशतवादी घोषित झालेला गोल्डी ब्रार हा पंजाबच्या श्री मुक्तसर साहेबाचा रहिवासी आहे. त्याचा जन्म 11 एप्रिल 1994 रोजी झाला असून सध्या तो ब्रॅम्प्टन आणि कॅनडा याठिकाणी राहतो. त्याठिकाणी तो खलिस्तानी दहशतवाद्यांशी संगनमत करून भारतविरोधी काम करत आहेत. कॅनडामध्ये बसून त्याने पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचा संपूर्ण कट रचला होता. यानंतर त्याने सोशल मीडियावर घोषणा करून मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारीही स्वीकारली होती.

हेही वाचा – Koregaon Bhima विजयस्तंभाच्या स्मारकासाठी शासनाने ‘शंभर’ एकर जमीन संपादीत करावी; आठवलेंची मागणी

गोल्डी ब्रारचे गँगस्टर लखबीर सिंग लांडाशी थेट संबंध

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने आणखी एक गँगस्टर लखबीर सिंग लांडा यालाही दहशतवादी म्हणून घोषित केले होते. लखबीर सिंग लांडा हा बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे आढळून आले होते. याशिवाय गोल्डी ब्रारचेही त्याच्याशी थेट संबंध असल्याचे आढळून आले आहे. लखबीर सिंग लांडा पाकिस्तानात राहणारा खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ ​​रिंदा याच्यासोबत काम करतो. पंजाबमधील मोहाली आणि तरनतारन येथे रॉकेट हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी त्याच्यावर 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -