घरदेश-विदेशJapan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचा इशारा

Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचा इशारा

Subscribe

आज जपानमध्ये 7.6 रिश्टल स्केलचा भूकंप झाला आहे.

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपामध्ये मोठी नैसर्गिक आपत्ती आली आहे. आज जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाला आहे. यामुळे इशिकावा, तोयामा प्रीफेक्चर्स आणि निगाता परिसरात त्युनामीचा इशारा जपानच्या हवामान विभागाने दिला आहे.

पश्चिम जपानच्या इशिकावा परिसरात 7.6 रिश्टरल स्केल तीव्रतेचा भूकंपचा बसला आहे. या तीव्रतेच्या भूकंपामुळे समुद्रात 5 मीटरपर्यंतचा लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे समुद्र किनारी राहणाऱ्या नागरिकांनी  उंच ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन जापानच्या सरकारकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

जपानमधील भूकंपामुळे न्यूक्लिअर पॉवर प्लँाटला काही धोका निर्माण झाला आहे का ? यासंदर्भात सुरू असून होकुरिकू इलेक्ट्रिकल पॉवर कंपनीचे आहेत.  जपानमध्ये 7.6 आलेल्या भूकंपामुळे रस्ते दुभंगण्याचा धोका आणि इमारती कोसळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे भूकंपामुळे समुद्रात मोठमोठ्या त्सुनामीच्या लाटा येण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी जपानमध्ये 2011 मध्ये मोठा भूकंप आणि त्सुनामी आली होती. यामुळे जपानमधील अनेक शहरे उद्धवस्त झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -