घरदेश-विदेशJapan Earthquake : जपानमधील भूकंपाचा भारतीय अभिनेत्याला फटका; Tweet करत सांगितली आपबिती

Japan Earthquake : जपानमधील भूकंपाचा भारतीय अभिनेत्याला फटका; Tweet करत सांगितली आपबिती

Subscribe

झालं असं की, 1 जानेवारी रोजी जपानमध्ये भूकंप झाला. जपानी नागरिक जिवाच्या आकांताने सैरवैर धावत होते. हे सगळं चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल असून, जगभरातील प्रसार माध्यमांवरही दाखविण्यात येतेय. जपानमधील भूकंपाचा फटका भारतीय अभिनेता विशेषतः दाक्षिणात्य सुपरस्टार Jr NTR बसला आहे.

नवी दिल्ली : भूकंपाचा देश म्हणून ओळख असलेल्या जपान देशाचा वर्षाचा पहिला दिवस धक्कादायक असाच ठरला. 1 जानेवारी रोजी जपानमध्ये एकापाठोपाठ भूकंपाचे 21 धक्के जपानी नागरिकाना सहन करावे लागले. यामध्ये भारतीय अभिनेत्यांलाही फटका बसला आहे. तेव्हा तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की कोण हा अभिनेता तर चला जाणून घेऊया. (Japan Earthquake Indian actor hit by earthquake in Japan The incident was reported by tweeting)

झालं असं की, 1 जानेवारी रोजी जपानमध्ये भूकंप झाला. जपानी नागरिक जिवाच्या आकांताने सैरवैर धावत होते. हे सगळं चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल असून, जगभरातील प्रसार माध्यमांवरही दाखविण्यात येतेय. जपानमधील भूकंपाचा फटका भारतीय अभिनेता विशेषतः दाक्षिणात्य सुपरस्टार Jr NTR बसला आहे. कारण, नववर्ष स्वागतासाठी कुटुंबीयांसोबत जपानमध्ये असलेला अभिनेता ज्युनिअर एनटीआर यालासुद्धा या भूकंपाचा फटका बसला आहे. काही तास त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना जपानमध्ये अडकून बसावे लागले. मात्र, काही वेळानंतर अभिनेता ज्युनिअर एनटीआर आणि त्याचे कुटुंबीय सुखरूप मायदेशात परतले असून, अशी माहिती अभिनेता ज्युनिअर एनटीआरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्वीटरवर पोस्ट करत दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Truck Driver Protest: ट्रक चालकांच्या संपामुळे राज्यात अभूतपूर्व परिस्थिती; सरकारने तोडगा काढावा, राऊतांचं विधान

आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू

जपानमध्ये भूकंप होणे हे नित्याचेच. परंतु त्या होणाऱ्या भूकंपाची तीव्रता कधी कमी तर कधी जास्त असते. परंतु काल झालेल्या 4.0 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या 21 धक्यांनी जपानी नागरिक भयभयीत झाले होते. या एकूण 21 भूकंपामध्ये एका भूकंपाची तीव्रता ही 7.6 एवढी होती. यामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर भुकंपाच्या धक्क्यानंतर रस्ते व घरांची दूरवस्था झाली असून, हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास जपान सरकारने सांगितलं आहे. याचदरम्यान, दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआर जपानमध्ये अडकला होता. तो मात्र आता सुखरूपपणे भारतात परतला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Transport strike : असे राक्षसी कायदे करण्यात आले तर…, जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारवर निशाणा

JR NTR देवरा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता ज्युनिअर एनटीआर सध्या त्याच्या देवरा नावाच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असून, त्याचा हा देवरा चित्रपट 8 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असे जरी असले तरी दिग्दर्शक राजामौली यांचा आरआरआर या चित्रपटामुळे आणि आणखी काही दाक्षिणात्य चित्रपटामुळे तो प्रसिद्ध आहे हे विशेष.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -