घरमनोरंजनबॉयफ्रेंड शिखरसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली जान्हवी कपूर

बॉयफ्रेंड शिखरसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली जान्हवी कपूर

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. चित्रपटांसोबतच जान्हवी अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. जान्हवीला मागील काही दिवसांपासून अनेकदा तिच्या एक्स बॉयफ्रेंड शिखर पाहाडियासोबत बऱ्याच ठिकाणी स्पॉट करण्यात आलं आहे. दरम्यान आता अशातच त्यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे जान्हवी आणि शिखर पुन्हा एकदा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया पुन्हा एकदा एकमेकांना डेट करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच जान्हवी आणि शिखर यांनी पुन्हा एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी ते पुन्हा एकत्र आले. तेव्हापासून ते दोघेही सतत एकत्र दिसतात.

शिखरसोबत जान्हवी एअरपोर्टवर स्पॉट

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

जान्हवी न्यु ईयर सेलिब्रेट करण्यासाठी बॉयफ्रेंड शिखर पाहाडियासोबत मुंबईबाहेर गेली होती. नुकतीच ती मुंबईत परतली यावेळी तिला एअरपोर्टवर स्पॉट शिखरसोबत एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं.

कोण आहे शिखर पाहाडिया?

शिखर पाहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पाहाडिया यांचा तो मुलगा आहे. याआधी देखील जान्हवी आणि शिखरला एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. 2016 मध्ये जान्हवी आणि शिखर एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर काही दिवसांनी ते वेगळे झाले. त्यांच्या नात्याबाबत ‘कॉफी विथ करण 7’मध्ये देखील जान्हवीने खुलासा केला होता. दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपासून दोघांनी पुन्हा आपल्या नात्याचा सुरुवात केली असल्याचं म्हटलं जात आहे.


हेही वाचा : १२ जानेवारीपासून थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव प्रारंभ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -