घरदेश-विदेशझारखंडमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना, डझनभर मजुर जमिनीखाली

झारखंडमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना, डझनभर मजुर जमिनीखाली

Subscribe

झारखंडमधील धनबादमध्ये अवैध कोळसा खाणकाम सुरु असताना एक मोठी दुर्घटना घडली आहे. निरसा विधानसभा मतदारसंघातील डुमरजोड येथे बेकायदेशीर कोळसा उत्खननादरम्यान जमीन 50 फूट खोल खचली आहे. चिरकुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत डझनभर मजुर गाडले गेल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान या मजुरांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. कोळसा खाणीत असे प्रकार सतत घडत असल्याने पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

भारतामध्ये सर्वात जास्त कोळसा खाणी झारखंडमध्ये आहेत. भौगोलिक सर्वेनुसार, देशातील सर्वात जास्त म्हणजे ८३ हजार १५२ मिलियन टन कोळसा झारखंडमध्ये आहे. याठिकाणी बेरोजगारीचे प्रमाण अधिक असल्याने इथे अवैध्यरित्या कोळसा उत्खनन करणाऱ्या माफियांचा सुळसुळाट आहे. या अवैध कोळसा खाणीत गावातील मजूर मोठ्या संख्येने काम करतात. कोळसा खाणीत काम करणाऱ्या मजुरांमध्ये स्त्रियांचे प्रमाण अधिक असून पुरुष इतर राज्यांमध्ये कोळश्याची विक्री करतात.

- Advertisement -

याच महिन्यात कोळसा कोसळून आणखी दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. नुकतेच निरसा परिसरातील कापसरा ओसीपी, गोपीनाथपूर ओसीपी, दहिबारी येथे अवैध खाणकाम सुरू असताना डझनभर मजुरांचा कोळसा खाणीत दबून मृत्यू झाला होता. त्यानंतरही या भागात अवैध कोळसा उत्खनन सुरू असून, ते रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -