घरमहाराष्ट्रउच्च न्यायालयाने ठाकरे सरकारची इज्जत काढून त्यांच्या हातात दिली - सोमय्या

उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारची इज्जत काढून त्यांच्या हातात दिली – सोमय्या

Subscribe

आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांची गेले चार दिवस आर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत होती. आज सोमय्या यांची चौकशी संपली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी ठाकरे सरकारव टीका केली. उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारची इज्जत काढून त्यांच्या हातात दिली, असं सोमय्या म्हणाले.

उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारची इज्जत काढून त्यांच्या हातात दिली. आधी शिवसेना नेत्यांनी बातमी द्यायची आणि त्या बातमीच्या आधारावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वळवला. त्यामुळे न्यायालयाने वास्तिकतेच्या आधारावर सोमय्यांना अटक करता येत नाही असं संरक्षण दिलं आहे, असं सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

न्यायालयात न्याय मिळेल

चार दिवसांची चौकशी आता संपली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. सौजन्यपूर्वकपणे त्यांनी वागणूक दिली. जी माहिती पाहिजे ती त्यांना दिली. मला विश्वास आहे की न्यायालयात न्याय मिळेल, असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला.

नील सोमय्यांनाही हायकोर्टाचा दिलासा

आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यानंतर त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने नील सोमय्या यांना २८ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. हे संरक्षण देत असताना आर्थिक गुन्हे शाखेत तीन तास हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

- Advertisement -

या याचिकेवर आज बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ५० हजाराच्या जातमुचलक्यावर नीस सोमय्या यांना जामीन दिला आहे. जामीन देत असताना न्यायालयाने २८ एप्रिलपर्यंत सोमय्या यांना अटक न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत. तर नील सोमय्या यांना २५ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -