घरताज्या घडामोडीGoa Election 2022 : उत्पल पर्रिकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं, जितेंद्र आव्हाडांकडून खुली...

Goa Election 2022 : उत्पल पर्रिकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं, जितेंद्र आव्हाडांकडून खुली ऑफर

Subscribe

उत्पल पर्रिकरांना राष्ट्रवादीकडून निवडणूक लढा अशी ऑफर देणार असून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

गोव्यात राजकीय घडमोडींना वेग येताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड गोव्यात दाखल झाले आहेत. उद्या शिवसेनासोबत चर्चा करुन राष्ट्रवादीकडून निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते उत्पल पर्रिकर यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून लढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून उत्पल पर्रिकरांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये आता आव्हाडांनीसुद्धा उत्पल पर्रिकरांना थेट खुली ऑफर दिली असून त्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संपर्क साधला आहे. यावेळी उत्पल पर्रिकरांबाबत आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. पर्रिकरांना तिकीट नाकारले जात असल्यामुळे आव्हाड म्हणाले की, भाजपचा हाच दुवा चुकलेला दिसतो आहे. महाराष्ट्रातसुद्धा बाहेरुन आलेल्यांना फार महत्त्व दिले जाते. त्यांची पाया मजबूत असल्यामुळे भाजप आहे पण त्यांनी त्यांचा पाया कमकुवत केला तर येणाऱ्या काळात त्यांना देशात अडचणी येतील. जे काँग्रेसमधून आलेत ते काँग्रेसमध्ये वाढू शकले नाही, त्यांचे झाले नाही तर तुमचे कसे होणार? ज्या पर्रिकरांनी भाजपला गोव्यातील घराघरात नेले, ते कुठेही चणे खात असताना दिसायचे आणि उभे राहिलेले दिसायचे, मच्छि मार्केटमध्ये फिरायचे, स्कुटरवर फिरायचे त्यांना गोव्याचे लोक आपले मानत होते. पण अचानक आता भाजपने ठरवलं आहे की, नेत्याच्या मुलाला तिकीट द्यायचे नाही हे चुकीचे आहे असे आव्हाड म्हणाले आहेत.

- Advertisement -

उत्पल पर्रिकरांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा देऊ

उमेदवाराला काम दाखवावे लागणार हे ठिक आहे. परंतु आपण भारतीय संस्कृतीमध्ये राहतो त्यामुळे पर्रिकरांच्याबाबत असलेली लोकांची सहानुभूती काही बोला तरी नाकारता येणार नाही. जर उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून उभे राहिले तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा देण्यात येईल. त्यांना येत्या एक ते दोन दिवसांत भेटणार असून आमंत्रण देणार असल्याचेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. तसचे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढा अशी ऑफर देणार असून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : अरे बापरे! धावत्या ट्रेन समोर महिलेला दिला धक्का अन् म्हणाला…

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -