घरदेश-विदेशहमे किसी का डर नही!

हमे किसी का डर नही!

Subscribe

२6 जुलै अर्थात आज कारगिल विजय दिवस.18 हजार फूट उंचीवर प्रचंड बर्फाळ प्रदेशात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी कारगिलचे युद्ध जिंकले. सर्वात जास्त उंचीवर लढले गेलेले अत्यंत अवघड युद्ध असेच याचे वर्णन करावे लागेल. आज या विजयाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. घरवाला घर नही हमे किसीका डर नही… असा डायलॉग एलओसी कारगील या सिनेमात होता. तो कारगील युद्धावेळी आणि आताही भारतीय जवान सार्थ ठरवत आहेत.

कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो आणि जमीनीवर बर्फ साचलेला असतो. उणे ३० ते उणे ४० इतके तापमान या भागात असते. यामुळे १९९९ साली लडाख ते कारगिलपर्यंतच्या या मोठ्या सीमेवर फक्त एक ब्रिगेड म्हणजे केवळ तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर केवळ तीन ते चार हजार सैनिक होते. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या कारगिलच्या डोंगरांवरती आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित केल

- Advertisement -

भारतीय सैन्याला ही गोष्ट समजल्यानंतर भारतीय हद्दीतून पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन विजय ही मोहिम राबविली. सुरूवातीला हे आमचे सैनिक नसून दहशतवादी असल्याचा कांगावा पाकिस्तानने केला. पाकिस्तानी सैन्याच्या नॉर्दन लाईट इन्फंट्रीच्या ११हून अधिक बटालियन्स (एका बटालियनमध्ये ७५० ते १००० सैनिक असतात) यांनी कारगिलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घुसखोरी केली होती. त्यांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने १० ते १५ हजार सैनिकांच्या दोन तुकड्या युद्धभूमीवर उतरवल्या होत्या. २६ जुलै१९९९ रोजी शैवटच्या पाकिस्तानी सैनिकाला मारण्यात आल्याने हा दिवस ‘कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

भारत बेसावध असताना पाकिस्तानने अतिशय शिस्तबद्धरीत्या कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेण्यास सुरुवात केली. या घटनेची कोणतीही माहिती भारतीय गुप्तहेर खात्याला मिळाली नव्हती. त्यामुळे जगभरातून भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले. सर्वात महत्वाच्या अशा टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्न झाले. या लढाईत पाकिस्तानने भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजवले. अखेर 4 जुलै रोजी टायगर हिलवर भारताने ताबा मिळवला. या लढाईत भारताचे 5 सैनिक शहीद झाले.

- Advertisement -

कारगिल युद्धानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय सामाजिक बदल पाहायला मिळाले. पाकिस्तानमध्ये युद्धानंतर लष्कर आणि सरकार यांच्यातील दरी वाढत गेली. शिवाय युद्धानंतर लगेच पाकिस्तानमध्ये लष्करी राजवट लागू करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -