घरलाईफस्टाईलट्राय करा सुक्या मेव्याची चटणी

ट्राय करा सुक्या मेव्याची चटणी

Subscribe

आपण नेहमी ट्राय फ्रुड्स हे सुका मेवा म्हणून खात असतो. आपल्या घरी सकाळी उठल्या उठल्या ट्राय फ्रुड्स खाण्यावरून वाद चालू असतात. काही लोकांना ट्राय फ्रुड्स हे खायला आवडत नाही. त्यामुळे खास ट्राय फ्रुड्स न आवडणाऱ्या लोकांसाठी ही आजची रेसिपी आहे. तसंही आपल्याला नवीन ट्राय करायला खूप आवडत. त्यामुळे सुक्या मेव्याची चटणी ही नक्की ट्राय करून पाहा.

साहित्य

किसलेला गूळ दोन चमचे, एक चमचा बेदाणे, लिंबाच्या आकारएवढी चिंच, दहा काजू, एक चमचा सुक्या खोबऱ्याचा किस, भाजून साल काढलेले दाणे एक चमचा, तिखट अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, तीळ एक चमचा, भाजलेल्या जिऱ्याची पुड अर्धा चमचा.

कृती

  • पहिल्यांदा चटणी करण्यापूर्वी चिंच स्वच्छ धुवून दोन तास अगोदर भिजत घाला. नंतर तिचा कोळ काढून तो गाळून घ्या.
  • खोबऱ्याचा आणि तीळाचा किस वेगवेगळा भाजून घ्या.
  • काजू आणि दाणे यांची मिक्सरला बारीक पूड करा. त्यातच तीळ आणि खोबरे याचाही पूड करा.
  • एक कढई घ्या. त्यात चिंचेचा कोळ घाला, मग त्यातच सर्व पुडी, मीठ, बेदाणा, गूळ, तिखट, घालून मंद आचेवर शिजवत ठेवा.
  • ती चटणी सतत हलवत राहा जणेकरून ती खाली लागणार नाही.
  • शेवटी जिरेपूड घालून गॅस बंद करा. ही झाली सुक्या मेव्याची चटणी.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -