घरताज्या घडामोडीMahanaryaman Scindia: क्रिकेटच्या मैदानात ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलाची एन्ट्री, मिळाली ही जबाबदारी

Mahanaryaman Scindia: क्रिकेटच्या मैदानात ज्योतिरादित्य शिंदेंच्या मुलाची एन्ट्री, मिळाली ही जबाबदारी

Subscribe

क्रिकेटच्या मैदानात राजकारणातील अनेक बड्या नेत्यांच्या मुलांची एन्ट्री होताना पहायला मिळत आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादवने देखील क्रिकेटमध्ये एन्ट्री घेतली होती. परंतु क्रिकेटच्या मैदानात तो स्टार न होता तेजस्वी यादव बिहारच्या राजकारणात मात्र यशस्वी झाले. मात्र, तेजस्वी यादव यांच्यानंतर आता केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा मुलगा महान आर्यमन शिंदेंनी क्रिकेटच्या क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे.

ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी महान आर्यमन यांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी एका प्रेस नोटच्या माध्यमातून याबाबत माहिती देण्यात आली. या प्रेस नोटमध्ये असं लिहिलंय की, ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनचे संरक्षक ज्योतिरादित्य शिंदेंनी एक नवीन कार्यकारिणी तयार केली आहे. ज्यामध्ये अत्यंत अनुभवी माजी आयएएस प्रशांत मेहता यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विशेषत: महान आर्यन शिंदे ही नवीन पिढी असून युवा विचाराने त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हे अतिशय मोठं पाऊल आहे.

- Advertisement -

महान आर्यमनचे वडील ज्योतिरादित्य शिंदे आणि आजोबा माधवराव शिंदे यांच्या दोघांचेही क्रिकेटशी घट्ट नाते आहे. ज्योतिरादित्य शिंदे सध्या ग्वाल्हेर डिव्हिजन क्रिकेट असोसिएशनचे संरक्षक आहेत. त्यांनी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषवले आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी महान आर्यनने वडिलांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. नरेंद्र मोदी हे स्वत: शिंदे यांच्या घरी पोहोचले होते. सोशल मीडियावर व्हारयल झालेल्या फोटोंमध्ये आर्यमन पीएम मोदींच्या जवळ उभे असताना दिसत आहे.

मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये वडील ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रचाराची धुरा देखील महान आर्यमनने सांभाळली आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळात ग्वाल्हेरमधील राजकीय कार्यक्रमांमध्ये देखील ते दिसले आहेत. मात्र, क्रिकेट व्यतिरिक्त राजकारणात देखील महान आर्यमन पाऊल ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -