घरदेश-विदेश'अँग्री मॅन' एम एच अंबरीश यांचे निधन

‘अँग्री मॅन’ एम एच अंबरीश यांचे निधन

Subscribe

कांतीरवा स्टेडिअमवर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी आणि अभिनेता रजनीकांत यांनी अंबरीश यांना श्रध्दांजली वाहिली.

कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री एम एच अंबरीश यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी रात्री अकराच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. कांतीरवा स्टेडिअमवर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी आणि अभिनेता रजनीकांत यांनी अंबरीश यांना श्रध्दांजली वाहिली. अंत्यदर्शन करण्यासाठी कर्नाटकातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. अंबरीश यांच्या पाश्ताच त्यांची पत्नी अभिनेत्री सुमनलता आणि मुलगा अभिषेक असा परिवार आहे.

- Advertisement -

उपचारा दरम्यान मृत्यू

गेल्या काही वर्षापासून एम एच अंबरीश आजारी होते. २०१५ मध्ये त्यांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे त्यांना एअर अॅम्ब्युलन्सद्वारे सिंगापूरला उपचारासाठी नेण्यात आले होते. गुडघे आणि फुफ्फुसाच्या आजाराने ते ग्रस्त होते. त्यांना रात्री नऊ वाजता अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ते घरात पडले. त्यानंतर ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

२०० चित्रपटात केले काम

लोकसभाचे तीन वेळा सदस्य राहिलेले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. अंबरीश कर्नाटक सरकारचे मंत्री देखील होते. विद्रोही अभिनेताच्या नावाने प्रसिध्द असलेले अंबरीश यांनी आतापर्यंत २०० चित्रपटात काम केले आहे. त्यांना अँग्री मॅन म्हणूनही ओळखले जायचे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -