घरदेश-विदेशआता घरी बसून मतदान करणं आहे शक्य, व्होट फ्रॉम होमची घोषणा...

आता घरी बसून मतदान करणं आहे शक्य, व्होट फ्रॉम होमची घोषणा…

Subscribe

अंधेरी पोटनिवडणूकीनंतर कर्नाटकात पहिल्यांदाच 'व्होट फ्रॉम होम' हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

राजकीय कारणांमुळे मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणूक चर्चेत आली होती. आणखी एका कारणामुळे ही निवडणूक चर्चेत आली ती म्हणजे ‘व्होट फ्रॉम होम’ ही संकल्पना… म्हणजेच घरातून मतदाना करण्याची सोय. निवडणूक आयोगाच्या या प्रयोगाला अंधेरी पोटनिवडणूकीत भरघोस यश मिळाले. या मतदारसंघात नोंदणीकृत ३९२ मतदारांनी ‘व्होट फ्रॉम होम’ चा पर्याय निवडून आपले लोकशाही कर्तव्य पार पाडले होते. अंधेरीत यशस्वी झालेल्या या प्रयोगाची आता अधिकृत घोषणा केली आहे.

नुकतंच कर्नाटक राज्यात निवडणूकांचं बिगुल वाजलं असून रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. व्होट फ्रॉम होमची संकल्पना आता कर्नाटकातून सुरू होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीच याबाबत घोषणा केलीय. राज्यातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 13 मे रोजी मतमोजणीत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल. कर्नाटक निवडणुकीत निवडणूक आयोग वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी एक नवीन आणि विशेष सुविधा देणार आहे. विधानसभा निवडणुकीत घरबसल्या मतदानाची सुविधा ८० वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांसाठी उपलब्ध असेल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

- Advertisement -

हे ही वाचा: ‘मारुती’ची उडी! आणखी एक रेकॉर्ड; भारतातंच नव्हे तर विदेशातही क्रेझ

अंधेरी पोटनिवडणूकीनंतर कर्नाटकात पहिल्यांदाच ‘व्होट फ्रॉम होम’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. कर्नाटकात ८० वर्षावरील १२.१५ लाख मतदार तर दिव्यांग मतदार एकूण ५.५५ लाख इतकी संख्या आहेत. अनेकदा वयोमान, आजारपण आदी कारणांमुळे अनेक मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता येत नाही. त्याचा परिणाम मतदानाची टक्केवारी घटण्यातही दिसून येतो. निवडणूक आयोगाच्या या विशेष मोहिमेमुळे वृद्ध, आजारी व्यक्तींना घरातून मतदान करता येणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढणार, असा अंदाजही वर्तवण्यात येतोय.

- Advertisement -

हे ही वाचा: भडकाऊ भाषणावरून सुप्रीम कोर्टाचे शिंदे-फडणवीस सरकारला आदेश, वाचा सविस्तर…

घरबसल्या मतदान करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

  • पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे मत देण्यासाठी फॉर्म 12D भरावा लागेल.
  • एकदा तुम्ही हा फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर तुम्ही मतदान केंद्रावरील सामान्य मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाही.
  • बूथ लेव्हल ऑफिसर अर्जदारांच्या घरी येऊन आवश्यक फॉर्म भरून घेतील.
  • निवडणूकीची अधिसूचना जारी झाल्यापासून पाच दिवसांच्या आत तुम्ही हा फॉर्म अधिकाऱ्याला परत करणे आवश्यक आहे.
  • मतदान पथक तुमच्या घरी कधी भेट देणार आहे त्या तारखेची तुम्हाला आगाऊ माहिती दिली जाईल.
  • तुमचे मत गोळा करण्यासाठी ही टीम तुमच्या घरीही येणार आहे. व्हिडीओवरही मतदानाची नोंद होणार आहे.
  • पोस्टल मतदानाची ही प्रक्रिया निवडणुकीच्या मतदानाच्या तीन दिवस आधी संपणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -