घरदेश-विदेशकाश्मिरी पंडितांचा मारेकरी बिट्टाविरोधात 31 वर्षांनंतर चालणार खटला

काश्मिरी पंडितांचा मारेकरी बिट्टाविरोधात 31 वर्षांनंतर चालणार खटला

Subscribe

बिट्टा कराटेने थेट टेलिव्हिजनवर आपल्या खुनाची कबुली दिली आहे

काश्मिरी पंडितांची निघृण हत्या करणाऱ्या बिट्टा कराटेवर तब्बल 31 वर्षांनंतर खटला चालवला जाणार आहे. मारेकरी बिट्टा कराटे याचे खरे नाव फारूख अहमद दार असे आहे. 1990 मध्ये जवळपास 30 ते 40 काश्मिरी पंडितांची हत्या केल्याचे स्वतः बिट्टाने कबूल केले. याप्रकरणी त्याच्याविरोधात आता खुनाचा खटला चालणार जाणार आहे. व्यावसायिक सतीश टिकू यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी श्रीनगर न्यायालयात पुन्हा सुनावणीसाठी अर्ज केला आहे.

पहिल्या सुनावणीत काय झाले?

न्यायालयाने सतीश टिकूच्या कुटुंबियांना सुनावणीदरम्यान याचिकेची हार्ड कॉपी सादर करण्यास सांगितले आहे. आता या प्रकरणावर 16 एप्रिलला पुन्हा सुनावणी होणार आहे. टिकूच्या कुटुंबाच्या वतीने वकील उत्सव बैंस न्यायालयात आपली बाजू मांडत आहेत.

- Advertisement -

फारूखला बिट्टा कराटे हे नाव कसे पडले?

बिट्टा कराटेने थेट टेलिव्हिजनवर आपल्या खुनाची कबुली दिली आहे. फारुख अहमद दार याला बिट्टा कराटे हे नाव कसे पडले याविषयी अनेकांनी प्रश्न उपस्थित केला. यामागचे खरे उत्तर म्हणजे फारूख अहमद दार याने मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले होते.

- Advertisement -

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यानंतर काश्मिरी पंडितांना न्याय देण्याची मागणीही देशभरातून जोर धरू लागली आहे. तर काश्मिरी पंडितांवर अत्याचार करणाऱ्या दहशतवाद्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही लोक करत आहेत.

आरोपी बिट्टा सध्या जामिनावर बाहेर आहेत. निरपराध काश्मिरी लोकांची हत्या केल्याप्रकरणी त्याला तुरुंगवास भोगावा लागला. 1991 मध्ये त्याने एका मुलाखतीत 20 काश्मिरी पंडितांची हत्या केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याला सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. त्याच्यावर बंडखोरीशी संबंधित 19 हून अधिक खटले आहेत. तो 16 वर्षे तुरुंगात होता आणि त्यानंतर टाडा न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.


हेही वाचा : ICC ODI Ranking: आयसीसी ODI क्रमवारीत बांगलादेश पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -